Monday, August 31, 2026
Homeपुणेपिकअप वाहन चालवताना दुचाकीस्वारास दिली धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी-पोलीस...

पिकअप वाहन चालवताना दुचाकीस्वारास दिली धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी-पोलीस पाटलाची अल्पवयीन मुलगी चालवीत होती वाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.पुण्यातील कल्याणी नगर परिसरात बिल्डरच्या मुलाने पोर्शे करणे दोघांना चिरडले असल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील शिरुर तालुक्यातही असाच एक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने पिकअप वाहन चालवताना दुचाकीस्वारास धडक दिली.यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.तर एक गंभीर जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार,पुण्यातील शिरुर तालुक्याच्या अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी पिकअप वाहन चालवत होती.त्यावेळी तिच्या सोबत शेजारच्या सीटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते.यावेळी तिने पिकअप भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरुन धडक दिली.ही धडक इतकी गंभीर होती की,मालवाहू पिकअपने दुचाकीला २० ते ३० फूट फरफटत नेले.

या अपघातात दुचाकी चालक अरुण मेमाने यांचा जागीच मृत्यू झाला.तर महिंद्र बांडे हा जखमी झाला. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!