उद्रेक न्युज वृत्त :- अलीकडे जेवणानंतर छातीत जळजळ होण्याची तक्रार उद्भवत असते.अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.याचे कारण ॲसिडिटी असू शकते.परंतु प्रत्येक वेळी ॲसिडिटी असेल असेही नाही.अनेकदा हा हृदयविकारही असू शकतो. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. काही त्रास वाटत असेल तर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ला घेत उपचार करणे आवश्यक आहे. तसेच व्यायामासोबतच वेळेवर जेवण, पुरेशी झोप घेतल्यास त्रास कमी होतो.
छातीत जळजळ होत असेल तर ॲसिडिटी सोबतच हृदयविकाराची लक्षणे असू शकते.प्रत्येक वेळी ॲसिडिटी असेल असे नसते.पोट आणि अन्ननलिका यातील व्हॉल्व्ह लीक झाल्यावर जळजळ होते.
ॲसिडिटीची कारणे👇
अवेळी जेवण,व्यायाम नसणे,वजन वाढत जाणे,पुरेशी झोप नसणे,तेलकट पदार्थ खाणे ही मुख्य कारणे आहेत. वेदनाशक गोळ्या खाणे,स्टेराइड घेणे हे देखील कारण असू शकते.
काय काळजी घ्याल?👇
जेवण वेळेवर करावे,व्यायाम करावा,वजनावर नियंत्रण ठेवावे.हॉटेलमधील मसालेदार पदार्थ टाळावेत.स्पायसी व जंक फूड खाणे टाळावे.वेळेवर झोप घ्यावी तसेच तणाव कमी करणे आवश्यक आहे.

