- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगाव नजीकच्या संजयनगर (बंगाली कॅम्प)येथील पाच वर्षीय चिमुकला अंगणात लघुशंकेला उठलेला असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून उचलून नेल्याची घटना आज,गुरुवार २५ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.बिबट्याने चिमुकल्याच्या मानेला धरून उचलून नेत जंगलाच्या दिशेने जात असतांनाच नागरिकांनी आरडाओरड केली.त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.वंश प्रकाश मंडल वय ५ वर्षे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
आज पहाटेच्या सुमारास वंश झोपेतून उठून घरा समोरील अंगणात लघुशंकेला गेला असता दबा
धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. जवळच असलेल्या त्याच्या आजीने आरडारोड केल्याने परिसरातील नागरिकांनी धावपळ सुरू केली. चिमुकल्याला बिबट्या जंगल परिसरात नेणार तोच नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने वंशला खाली ठेवत जंगलाच्या दिशेने पसार झाला.ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता वंशला तात्काळ केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी वन विभागाप्रती रोष व्यक्त केला.
- Advertisement -

