- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.या वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत.यात दोन दांपत्ये असून या ११ जणांवर महाराष्ट्रात १ कोटीपेक्षा अधिकचे बक्षीस होते.छत्तीसगड सरकारनेही त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले होते.यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहे.३४ वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत.३ डिव्हिजन कमिटी मेंबर तर १ उपकमांडर,२ एरिया कमिटी मेंबर आहेत.या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.निवडणूक आचारसंहितेच्या काळात ५ नक्षली ठार झाले.२०२४ या वर्षांत २४ नक्षली ठार झाले आणि १८ माओवाद्यांना अटक करण्यात आली.गेल्या ६ महिन्यांत १६ जहाल नक्षलवादी आणि काल ११ असे २७ जण मुख्य प्रवाहात आले आहेत.या सर्व प्रयत्नांमुळे मोदींनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन !’
- Advertisement -

