- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक रा.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथे येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.या लोकअदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीने केले आहे.सदरची लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली आणि अहेरी तसेच अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा,कुरखेडा आणि सिरोंचा येथील तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केली जाईल.लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडीस पात्र दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे,चेक बाऊन्सची प्रकरणे (कलम १३८ एन.आय.ॲक्ट),भूसंपादन, कौटुंबिक वाद,मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई दावे,बँकेशी संबंधित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी,वीज वितरण कंपनी,पतसंस्था आणि नगर परिषद व ग्रामपंचायतीच्या कर आकारणीशी संबंधित प्रकरणे आपसी सामंजस्याने निकाली काढली जातील.
- लोकअदालतीचे फायदे👇
- प्रकरणे तडजोडीसाठी ठेवतांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- लोकअदालतीच्या निकालांविरोधात अपील करता येत नाही,त्यामुळे वादांचा त्वरित निपटारा होतो.
- न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकअदालतीतील निकालाची अंमलबजावणी करता येते.
- साक्षी-पुरावे,उलटतपासणी आणि दीर्घ युक्तिवादासारख्या वेळखाऊ प्रक्रियांना टाळता येते.
- निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम नियमानुसार परत मिळते.
सर्व पक्षकार,वकील आणि नागरिकांनी येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन आपापली प्रकरणे निकाली काढण्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सचिव ए.पी. खानोरकर यांनी केले आहे.
- Advertisement -

