Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणूक कालावधीत प्रवासात किंवा स्वतःजवळ जास्तीत जास्त किती रक्कम बाळगू शकता? घ्या...

निवडणूक कालावधीत प्रवासात किंवा स्वतःजवळ जास्तीत जास्त किती रक्कम बाळगू शकता? घ्या जाणून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे विविध नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकांमार्फत अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या पैशांवर लक्ष ठेवले जात आहे. निवडणुकीतील राजकीय पक्ष,उमेदवार यांच्यावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष आहेच शिवाय सर्वसामान्य नागरिकांवर आयोग लक्ष ठेवून आहे.या काळात सर्वसामान्य नागरिकाकडे ५० हजारांपेक्षा अधिक रोकड सापडून आल्यास त्याचा हिशेब द्यावा लागणार आहे.आपल्याकडे सापडून आलेल्या रकमेचा हिशेब न दिल्यास सर्वसामान्य नागरिकही अडचणीत येण्याची शक्यता आहे.राज्यात १५ ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने विविध यंत्रणा कामाला लावल्या आहेत.निवडणूक काळात पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होत असते.त्यामुळे निवडणूक आयोगाचे रोख रकमेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष आहे.यात सर्वसामान्य नागरिकांकडील अतिरिक्त पैशांवर आयोगाचे लक्ष राहणार आहे.निवडणूक काळात प्रवासात किंवा स्वतःजवळ जास्तीत जास्त ५० हजार रुपये बाळगता येतात.त्यापेक्षा अधिक रक्कम तपासणीत दिसून आल्यास तुम्हास चौकशीस सामोरे जाण्याची आपत्ती आहे.५० हजार रुपये
जर प्रवासात नाक्यावरील स्थिर तपासणी पथक किंवा
भरारी पथक यांना तुमच्याजवळ आढळल्यास त्याचा
हिशोब तुम्हास द्यावा लागणार आहे.म्हणजे हे पैसे कुठून आणले,कशासाठी काढले,कोणास देणार,अशी प्रश्न सरबत्ती होऊ शकते.त्यासाठी जवळ पुरावा असणे आवश्यक आहे.म्हणजे बँकेतून पैसे काढले असल्यास तसा पुरावा लागणार आहे.चेक देऊन काढले असल्यास चेकची झेरॉक्स किंवा तांत्रिक पुरावा म्हणजे बँकेचा पैसे काढल्याचा एसएमएस संबंधित तपासणी अधिकाऱ्यांस दाखवावा लागेल.तो नसेल तर मग तुमच्याकडील पैसे अधिकारी ठेवून घेईल.त्याची पावती देईल व सदर रकमेचा पुरावा दिल्यानंतर तुमचे पैसे तुम्हास परत मिळतील.पण याबाबत निवडणूक संहिता थोडी उदार पण आहे.पैसे घेऊन जाणारी व्यक्ती कोण व कशी आहे; हे प्रथमदर्शनी सहज ओळखता येऊ शकते.म्हणजे शेतकरी शेती खर्चाचे किंवा माल विक्रीचे पैसे घेऊन जात असेल तर त्यास नाहक त्रास देऊ नये,खरे काय ते ओळखावे,असे धोरण आहे.पण सामान्य माणूस या तपासणीत गोंधळून जातो.त्याच्याकडे असणाऱ्या रकमेचे त्यास योग्य समर्थन करता येईलच,असे नाही. अशा वेळी अधिकारी कसा आहे,यावर सगळे काही अवलंबून असते.
जवळ असलेल्या अधिकच्या पैशाचे समर्थन पुराव्याशिवाय करता आले नाही तर ते पैसे ठेवून घेत त्या व्यक्तीस बँकेकडून पैसे काढले,असे लिहून असणारा कागद आणावा लागणार आहे.अशी पद्धत निश्चित करण्यात आली आहे.त्यानुसार कार्यवाही होणार,पण वाद होऊ नये यासाठी नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या रकमेचा पुरावा जवळ ठेवणे हिताचे ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!