Friday, August 21, 2026
Homeगडचिरोलीनिराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार...!- तीन महिन्यांपासून रखडले मानधन....- संजय गांधी निराधार...

निराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार…!- तीन महिन्यांपासून रखडले मानधन….- संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट १ मे पासून जाणार बेमुदत संपावर ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यातील वृध्दांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचे गेले तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहेत.अशातच मानधना बाबत व इतर समस्यांचे शासन स्तरावरील महोदयांकडे निवेदने आणि आपबिती सांगूनही अक्षम्यपणे दुर्लक्ष केले जात असल्याने ‘निराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार’ त्यामुळे १ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संप पुकारला आहे.बेमुदत पुकारलेल्या संपात गडचिरोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचाही सहभाग असणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी संगायो विभाग गडचिरोली यांना सादर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना,कुटुंब आर्थिक सहाय्य लाभार्थी योजना व इतर वरिष्ठांनी सांगितलेली अशी अनेक कामे आय टी असिस्टंट यांना करावी लागतात. अशातही ‘बिन पगारी व फुल्ल अधिकारी’ बनविणे कितपत योग्य आहे.अनेक वर्षांपासून निराधारांसाठी आधार असलेले आय टी असिस्टंट तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत.याच भरवशावर अनेकांची कुटुंबे सुरू होऊन व परिवार वाढीस लागून,अहोरात्र काम करून,संसाराचा गाढा हाकण्यास कसे-बसे चालढकल करून जीवन जगीत आहेत.अशातही मानधन रखडले जात असेल तर याला काय म्हणावे?झोपलेल्या प्रशासनास कितीवेळा जागे करायचे? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

‘नियमित कर्मचारी तुपाशी आणि मानधन वा कंत्राटी कर्मचारी उपाशी’ अशी हल्ली परिस्थिती निर्माण झाली आहे.नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचारी वर्गांकडून शासकीय कामे सर्वात जास्त करवून घेतली जात आहेत.त्यामुळेच शासन तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करतांना दिसून येत आहे.कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करण्यात तर येत आहे;मात्र समान काम समान वेतनही लागू करणे तितकेच महत्त्वाचे आहे.यासाठी कित्तेक वर्षांपासून  संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट लढा देत आहेत.मात्र शासन स्तरावरून कुणी आधारच देईना..! यासाठी १ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संपावर जाणार असून गडचिरोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचा बेमुदत संपात सहभाग असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी.. -३० हजार घेतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पोलीस हवालदाराने दम देत परिसरात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर ३५...

पूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात  जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज शुक्रवारी वाटप...

रक्तदानातून आमदार रामदास मसराम यांना ५७ व्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.. – आज ५७ रक्तदात्यांचे रक्तदान; मिसार दाम्पत्य ठरले प्रेरणादायी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या उद्या,शनिवार २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार...

खतांच्या वाढिव किंमती कमी करुन युरिया खताचा काळाबाजार रोखण्याची मागणी.. – देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-खताच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आला असुन सद्या कृषी केन्द्रांमार्फत युरिया खताचा काळाबाजार सुरु आहे.या भ्रष्टाचारावर लगाम घालुन खताच्या किंमती पुर्ववत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!