- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे मंगळवारी २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैसरन मैदानावर बंदूकधारी सैनिकी गणवेशात येत दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारत शिवीगाळ केली आणि घोडेस्वारीचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला.झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे.बैसरन व्हॅली हे पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी फक्त घोड्याने किंवा पायीच जाता येते.दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आनंद लुटण्यासाठी भेट देत असतात.गोळीबाराची घटना अशा वेळी घडली,ज्यावेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात होते.दहशतवादी हल्ला झाला,तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून गेल्या तीन रात्रीपासून सीमेवर गोळीबार सुरू आहे.याला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे.अशातच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ)काल,शनिवारी नियंत्रण रेषेजवळील शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.येत्या ४८ तासांमध्ये शेतातील पिकांची कापणी करून मैदान साफ करण्याचे तातडीचे निर्देश बीएसएफने शेतकऱ्यांना दिले आहेत.सीमेवरील हालचाली अचानक वाढल्याने काहीतरी मोठ्या घडामोडी घडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.भारताने अटारी-वाघा बॉर्डर बंद केली असून पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच व्हिसाही रद्द करण्यात आला आहे. अशातच आता पाकिस्तान सीमेजवळ असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना ४८ तासांमध्ये पिकांची कापणी करण्यास सांगण्यात आले आहे.अमृतसर,तरन तारन, फिरोझपूर,फाजिल्का येथे गुरुद्वारांमधून सूचनाही प्रसारित केल्या जात आहेत.बीएसएफचे जवान गेल्या दोन दिवसांपासून शेतातील पिकांची कापणी करण्यास सांगत आहेत.परिस्थिती आणखी चिघळल्यास पुढे वेळ मिळणार नाही. गुरांसाठीचा चारा वर्षभर वापरला जातो.८० टक्के गव्हाची कापणी पूर्ण झाली असून गुरांच्या चाऱ्यासाठी पेंढ्या करणे बाकी आहे.दोन दिवसात हे पूर्ण कसे होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.तसेच बीएसएफच्या इशाऱ्यामुळे शेतकरीही घाबरले आहेत. त्यामुळे पुढील काळात मोठ्या हालचाली सुरू होणार आहेत.
- Advertisement -

