Tuesday, May 26, 2026
Homeनागपूरनागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर; नुकसानभरपाईची रक्कम दंगेखोरांकडून करणार वसूल.. -...

नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर; नुकसानभरपाईची रक्कम दंगेखोरांकडून करणार वसूल.. – दंगेखोरांनी पैसे भरले नाहीत तर विकली जाणार प्रॉपर्टी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर शहरातील दंगलीबाबत ॲक्शन मोडवर आले असून आज,शनिवारी २२ मार्चला नागपुरात पत्रकार परिषद घेत सोमवारी १७ मार्चला
औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये आंदोलकांकडून प्रतिकात्मक कबर जाळत असतांना आयत लिहिलेली चादर जाळल्याचा अपप्रचार काही लोकांनी केला.यानंतर जमाव गोळा करून त्यांनी लोकांवर दगडफेक करून जाळपोळ केली.पोलिसांवर हल्ला केला.पोलिसांनी लाठीचार्ज,अश्रू नळकांड्या अशा प्रतिकात्मक गोष्टी केल्या.यातील सीसीटीव्ही  फुटेज,खासगी चित्रिकरण पोलिसांकडे देण्यात आले असून यातून आरोपींची ओळख पटवली जात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस म्हणाले.ज्यांची वाहने जाळण्यात आली,अश्यांना  येत्या तीन ते चार दिवसांत नुकसानभरपाई दिली जाणार आहे.आपण काही निर्बंध घालणार आहोत, त्याचा जनजीवनावर व व्यापारावर परिणाम होणार असल्याने त्यात शिथिलता आणली जाईल.पोलीस सजग आहेत.आता झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाईल,दंगेखोरांनी पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल,असे फडणवीसांनी म्हटले.दंगेखोरांना सरळ केले नाही तर त्यांना तशी सवय पडेल.त्यामुळे दंगेखोरांना धडा शिकवणे आवश्यक आहे.याप्रकरणी कुणालाही सोडणार नाही,असेही फडणवीस म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!