Saturday, May 2, 2026
Homeनागपूरनागपुरात राहुल गांधीचे आगमन होताच थेट पोहचले पवित्र दीक्षाभूमीवर...

नागपुरात राहुल गांधीचे आगमन होताच थेट पोहचले पवित्र दीक्षाभूमीवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-भाजपने शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसला घेरले असतांना पुन्हा एकदा लोकसभेपाठोपाठ संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस राज्यातील विधानसभा निवडणुकीला आक्रमकपणे सामोरे जाण्याच्या पवित्र्यात आहे.आज,बुधवार ६ नोव्हेंबरला दुपारी नागपुरात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत झाले.
नागपूर विमानतळावर व रस्त्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार करून ते थेट पवित्र दीक्षाभूमीवर पोहोचले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई,सचिव विलास गजघाटे यांच्या नेतृत्वात त्यांचे स्वागत करण्यात आले.यानंतर त्यांनी दीक्षाभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.
यावेळी राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,खासदार श्याम बर्वे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे,प्रफुल्ल गुडघे,बंटी शेळके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यानंतर दक्षिण पश्चिम,पश्चिम व दक्षिण मतदार संघातील काही भागातून रस्त्याने जात ते दुतर्फा उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचे,नागपूरकरांचे स्वागत स्वीकारून रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात ओबीसी युवा मंच व विविध संघटना तर्फे आयोजित संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित झाले.त्यानंतर ते मुंबईला रवाना रवाना होत मुंबईत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!