Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरना संत्री आला ना मंत्री; वाट पाहून थकल्या,निवेदन फाडले अन् घराकडे परतल्या.....

ना संत्री आला ना मंत्री; वाट पाहून थकल्या,निवेदन फाडले अन् घराकडे परतल्या.. – ही मोठी माणसे आपल्यासारख्या मोलकरणींना काय वेळ देतील?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सध्या स्थितीत नागपुरात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.अधिवेशन दरम्यान त्या-त्या क्षेत्रातील आमदार सरकारपुढे व्यथा मांडून उपाययोजना करण्यासाठी आवाज उठवत असतात.विशेष म्हणजे, अधिवेशन कालावधीत आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी बरेचजण आंदोलने,मोर्चे काढून सरकारचे तसेच संत्री-मंत्री यांचे लक्ष वेधून घेत असतात आणि आपले काही भले होईल,या आशेवर असतात.अश्याच प्रकारे शासनच नागपुरात आल्यामुळे आपल्या मागण्या मांडाव्या,आपल्यालाही न्याय मिळेल,या आशेपोटी घरची धुणीभांडी करणाऱ्या महिलांनी म्हणजेच ‘मोलकरीण’ यांनी  विधिमंडळावर मोर्चा काढला.मोर्चा काढला खरी, पण सकाळपासून सायंकाळ झाली तरीही त्यांच्याकडे ना कोणता संत्री भटकला ना कोणता मंत्री भटकला.शेवटी राय-राय झाल्या अन् ही मोठी माणसे आपल्यासारख्या मोलकरणींना काय वेळ देतील, असा विचार करून अखेर मोर्चात सहभागी मोलकरणींचा संयम सुटला. कोणालाच आपल्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ नाही, अशी मनोमन समजूत घालत त्यांनी मंत्रिमहोदयांना देण्यासाठी तयार केलेले निवेदन फाडले.मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध केला अन् त्या आपल्या घराकडे परत गेल्या.
काल बुधवारी जागृती मोलकरणी संघर्ष समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढला.त्यांनी आपल्या मागण्यांसाठी सकाळीच इतरांच्या घरी जाऊन आपली नियमित कामे पार पाडली.दुपारी १ वाजता त्या यशवंत स्टेडियमवर गोळा झाल्या.पावणे दोन वाजता यशवंत स्टेडियम येथून त्यांचा मोर्चा टेकडी मार्गाकडे निघाला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी विधानभवनात फोन करून कामगार मंत्र्यांना मोलकरणींच्या मोर्चातील शिष्टमंडळाच्या भेटीसाठी वेळ मागितली.परंतु त्यांना ठोस उत्तर मिळाले नाही.त्यानंतर दुपारी अडीच वाजता मोलकरणींचा मोर्चा टेकडी मार्गावर पोहोचला.तेथे रस्त्यावर बसून हातात मागण्यांचे फलक घेऊन त्यांनी नारेबाजी करून आपल्या व्यथा मांडत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी संबंधित पोलिसांनी पुन्हा एकदा कामगार मंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली.परंतु काहीच उत्तर मिळाले नाही.अखेर मोलकरणींनी कामगार राज्यमंत्र्यांच्या भेटीची तयारी दर्शविली मात्र,त्यांचीही वेळ मिळाली नाही.ही मोठी माणसे आपल्यासारख्या मोलकरणींना काय वेळ देतील,असा विचार करून अखेर मोर्चात सहभागी मोलकरणींचा संयम सुटला आणि आपापल्या घरी परतल्या.खरे म्हणजे,घरकाम करणारी,सांगितलेले काम इमानेइतबारे करणाऱ्या या मोलकरीण काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालनपोषण करतात.आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी एखादा व्यक्ती सरकारकडे नाही तर कुणाकडे अपेक्षा करणार.गोर-गरिबांच्या व्यथा ऐकून घेण्यात कुणालाही रस नसल्याचे सदरच्या प्रकारावरून दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!