Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनवरीला मेकप करणे पडले महागात- मेकप मुळे थेट पोहचली आयसीयू मध्ये

नवरीला मेकप करणे पडले महागात- मेकप मुळे थेट पोहचली आयसीयू मध्ये

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला मेकप करण्याचा व सुंदर दिसून सौंदर्य खुलविण्याचा सगळीकडेच कल  वाढलेला दिसून येतो.अशातच लग्न म्हटले तर आणखी त्यात भर पडून सगळ्यांपेक्षा खुलून व टवटवीत दिसावे यासाठी मेकपचा आधार घेतांना कित्येकजण दिसून येतात.विशेषता मुलींना त्यांच्या लग्नात सुंदर दिसण्याची मोठी हौस असते.अशीच हौस नव वधूला महागात पडली आहे.

कर्नाटकातील एका तरुणीला मेकअप केल्यामुळे थेट रुग्णालय गाठावे लागले आहे.मेकअप केल्यानंतर मुलीचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले आहे.इतकेच नाही तर यामुळे तिचे लग्नही पुढे ढकलण्यात आले. सदर प्रकरण समोर येताच तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.विशेष बाब म्हणजे ज्या ब्युटी पार्लरमधून पीडित तरुणीने मेकअप करुन घेतला ते हर्बल ब्युटी पार्लर असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मेकअपमुळे चेहरा खराब झालेली मुलगी जजूर गावची रहिवासी आहे.पीडितेचे लग्न ठरले होते. लग्नाच्या १० दिवस आधी तिने गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये मेकअप करून घेतला. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा सुजला होता. चेहऱ्यावरील तेजही गेले होते.ज्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा मेकअप करताना तिला नव्या पद्धतीचा मेकअप करत असल्याचे संबंधित ब्यूटीशियनकडून सांगण्यात आले. मात्र नवरीला हा मेकअप चांगलाच महागात पडला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!