- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्थापित महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार,नटराज पुरस्कार,विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन २०२५-२६ या वर्षासाठी प्रदान करण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.
सदर पुरस्कारांच्या माध्यमातून वीरशैव-लिंगायत समाजातील सामाजिक,कलात्मक,समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कारांच्या माध्यमातून समाजातील समाजसेवक,कलावंत,समाज संघटनात्मक कार्यकर्ते,आध्यात्मिक प्रबोधनकार तसेच साहित्यिक यांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी,हा शासनाचा उद्देश आहे.
प्रत्येक पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्था अशा दोन्ही गटांतून पात्र उमेदवारांचा विचार करण्यात येणार असून, संबंधित क्षेत्रातील सातत्यपूर्ण,प्रभावी व समाजहिताचे कार्य करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
सन २०२५-२६ या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ असून,इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक,इतर मागास बहुजन कल्याण,गडचिरोली यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत रितसर अर्ज सादर करावेत.अर्जाचा नमुना संबंधित कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन डॉ.सचिन मडावी, सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.
- Advertisement -

