Friday, September 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार तर एका जवानाला वीरगती...

नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; ४ नक्षलवादी ठार तर एका जवानाला वीरगती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगड राज्याच्या काही भागात नक्षली मोठ्या प्रमाणावर उपद्रव माजवित आहेत.दोन दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये डीआरजी, एसटीएफ आणि सीआरपीएफच्या चमूने संयुक्त कारवाई करीत ३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्याच्या इंदागाव ठाणा क्षेत्राच्या सोरनामाल जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक झाली होती. जवानांनी मोठा फौजफाटा घेऊन नक्षल्यांना हुसकावून लावत नक्षल्यांच्या शोध मोहिमेसाठी ३०० जवान रात्री उशिरा बाहेर पडले होते.त्यातच डीआरजी,एसटीएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी तीन नक्षल्यांना ठार केले होते.अशातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे; छत्तीसगडमधील अबुजमाडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे.चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाले असून एका जवानाला वीरगती प्राप्त झाली आहे. घटनास्थळावरून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.त्यामध्ये एके-४७ रायफलसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.अबुजमाडमध्ये नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

‘पीएम-जनमन’ अंतर्गत तुलशी पिडसे यांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार.. – योजनेअंतर्गत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुलशी दस्सा पिडसे यांच्या पक्क्या घराचे स्वप्न ‘पीएम-जनमन’ अंतर्गत मंजूर घरकुलामुळे साकार झाले आहे.प्रतिकूल कौटुंबिक...

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!