Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तधावपट्टीवरून उड्डाण करताच विमानाचा अपघात; विमानात २४२ नागरिक..

धावपट्टीवरून उड्डाण करताच विमानाचा अपघात; विमानात २४२ नागरिक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गुजरातमधील अहमदाबाद येथे आज,गुरुवार १२ जून रोजी दुपारच्या सुमारास एअर इंडियाचे एआय-१७१ नावाचे एक प्रवासी विमान कोसळले असून सदरचे विमान हे लंडनच्या गॅटविकला जात होते.विमानात २४२ प्रवासी,२ वैमानिक आणि १० कर्मचारी होते.त्यापैकी १६९ प्रवासी भारतीय,तर ५३ ब्रिटिश नागरिक होते,यातील १ व्यक्ती कॅनेडियन होता,तर ७ पोर्तुगालचे नागरिक होते.धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर मेघानीनगर परिसरात जमिनीवर कोसळला.अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलर नुसार, या विमानाने अहमदाबादहून दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले.त्यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलरला डिस्ट्रेस कॉल केला,परंतु त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलर कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.धावपट्टी २३ वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर पडला.विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती.सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.एअर इंडियाने १८००५६९१४४४(1800 5691 444)हा हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे.सदरचा नंबर फक्त या अपघाताशी संबंधित माहितीसाठी जारी करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!