Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाधावत्या रेल्वेगाडी समोर येत तरुणाची आत्महत्या..!

धावत्या रेल्वेगाडी समोर येत तरुणाची आत्महत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका विवाहित तरुणाने धावत्या मालवाहू रेल्वेगाडी समोर येत आत्महत्या केल्याची घटना आज, गुरुवार ८ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली.संदिप वसंत नाकाडे वय ४२ वर्षे,रा.ताडगांव, ता.अर्जुनी-मोरगाव,जि.गोंदिया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अर्जुनी-मोरगाव शहरात कृषी केंद्र चालवीत होता.
आज गुरुवारी सकाळच्या सुमारास गोंदियाहून चंद्रपुरकडे एक मालवाहू रेल्वेगाडी धावत होती.सदरची गाडी अर्जुनी-मोरगाव रेल्वे स्थानक परिसरात येताच संदिप नाकाडे हा तिच्या समोर आला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.दृश्य बघताच  घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव झाला.लागलीच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.संदिपने घेतलेला निर्णय कुटुंबियांवर मोठा आघात करून गेला आहे.तरुण व्यवसायिकाने आत्महत्या कां केली,अद्याप गूढ कायम आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!