Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तधनजय वंजारी सामाजिक बांधिलकीचे अधिकारी-डॉ.नामदेव खोब्रागडे यांचे प्रतिपादन

धनजय वंजारी सामाजिक बांधिलकीचे अधिकारी-डॉ.नामदेव खोब्रागडे यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-धनंजय वंजारी यांचा गोंदिया जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात व एका सामान्य परिवारात जन्म झाला.त्यांचे सुरूवातीचे जीवन अतिशय कठीण प्रसंगातून गेले आहे.त्यांचे शिक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ.कॉलेज जवळ असलेल्या कॅम्पसच्या वस्तीगृहात राहून पूर्ण केले.

वंजारी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतलेल्या परिक्षेत IRS या संविधानिक,मानाची व संविधानिक पावर असलेली जागा प्राप्त करून ते आयकर भवन नागपूर येथे सहायक आयुक्त पदी रूजू झाले.ते एवढ्या मोठ्या मानाच्या व सत्ता असलेल्या पदी असतांना त्यांच्या मध्ये अहंकार पणा कधीही दिसून आला नाही.

 वंजारी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान समतावादी व राष्ट्रवादी विचाराने प्रेरित होऊन सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.तसेच त्यांच्या उज्ज्वल व यशस्वी जीवनाचे महान तत्वज्ञान त्यांना त्यांच्या आईच्या संघर्षमय जीवनातून प्राप्त झाले आहे असे दिसून येते.

वंजारी यांच्या आयकर भवन नागपूर येथे सहायक आयुक्त पदी रूजू होताच भ्रष्टाचारि अधिकारी, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गोळा करणारे भ्रष्ट अधिकारी,भ्रष्ट अभियंता,कार्यकारी अभियंता, उपअभियंता,भ्रष्ट उच्चस्थ अधिकारी,भ्रष्ट जंगल वनपरिक्षेत्राधिकारी,सहायक उपवनसंरक्षक, उपवनसंरक्षक,गडचिरोली,चंद्रपूर जिल्हयातील आरोग्य विभागात चालू असलेल्या भ्रष्टाचारी व देशाचा कर डूबवून व भ्रष्टाचार करून देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या भ्रष्ट वृत्तीच्या लोकांमध्ये धाक निर्माण झाला आहे. 

समाजाभिमुख,समतावादी,कर्तृत्ववान,मनमिळाऊ, प्रामाणिक,व सचोटीबध्द अधिकारी वंजारी यांच्या हातून घडत असलेल्या महान कार्याचा गौरव डॉ. नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे केंद्रीय संघटक संविधान पर्यावरण व जंगल संरक्षण संघटना गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली आयकर भवन नागपूर येथे भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी चौधरी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,अजय चव्हाण नागपूर,आकाश सहारे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदि मान्यवर उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!