Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग बनला 'झोलबा पाटलाचा वाडा'…..- अरे गबाड्या तुझे आहे;...

देसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग बनला ‘झोलबा पाटलाचा वाडा’…..- अरे गबाड्या तुझे आहे; तुझ पाशी…..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये शासन स्तरावरून मंजूर केली जातात.मात्र जिल्ह्याचा विकास काही होईना…! कारण की,बाहेर ठिकाणाहून येणारे ‘सब माल डब्बे मे’ असे करून पोबारा करीत असतात.असाच प्रकार हल्ली सामाजिक वनीकरण विभागामध्ये सुरू असल्याने देसाईगंज सामाजिक वनीकरण विभाग बनला ‘झोलबा पाटलाचा वाडा’…..असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड म्हणजेच झाडे लावली जातात.जसे,मुख्य डांबरीकरण रस्त्याच्या कडेला,गावातील पांदन रस्ते,एखाद्या तलाव पाळीवर,शेतकऱ्यांच्या शेत बांधावर व इतर ठिकाणी वृक्ष लागवड म्हणजेच झाडे लावून; अशी झाडे जिवंत ठेवण्याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाची असते.त्यांचे मुख्य काम केवळ ‘झाडे लावा झाडे जगवा’ हे आहे.त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागास कोट्यवधी रुपये शासन स्तरावरून दिली जातात.मात्र शासन स्तरावरून दिला जाणारा निधी खरोखरच दिलेल्या कामांसाठी लावण्यात येतो काय?

देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना व इतर योजने अंतर्गत तसेच हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत असूनही न दिसल्या सारखे करणे म्हणजे ‘सांबर गेला एकीकडे व वडा राहिला दुसरीकडे’ असे एसीच्या रूममध्ये बसणाऱ्या हॉटेल अधिकाऱ्याचे झाले आहे.

देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीच्या काही साईटचे अवलोकन व प्रत्यक्ष साईटवर रामटेके यांनी भेट दिले असता रोपवन साईटवर बोर्ड लावणे आवश्यक असता; त्याठिकाणी बोर्डच नाही,काही अंतरावर वृक्षेच नाही,जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना जास्त दाखविणे,मोजमाप पुस्तिका प्रमाणित नाही,त्यावर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही,मोजमाप पुस्तिका अपूर्ण लिहिण्यात आल्या,अंदाज पत्रकानुसर तरतूद नाही,शेणखत,रोपे वाहतुकीच्या निविदा मागविण्यात आल्या नाही,मजुर पुरवठा स्वतः करण्यात आला,आपल्याच घरची संस्था निवड केली व इतर असे अनेक गैरव्यवहार व भ्रष्टाचार करून करोडो रुपये गब्बन करून ‘गब्बर सिंगची’ भूमिका बजावण्यात आली आहे.तरीही ‘तो’ म्हणतो अहवाल येऊ द्या..! ‘अरे सर्वच तुझे आहे; तुझ पाशी तरीही तुला कळेना..! कां बनतोस येळा गबाड्या… त्यामुळे सामाजिक वनीकरणाचे गणित अजूनही कुणालाच कळलेले नसल्याने सध्या ‘नरम व नंतर गरम’ असा माहोल दिसून येणार आहे.त्यामुळे ‘लोक सेवकांनो सावधान पुढील घंटा’ ही धोक्याचीच समजावी लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!