- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात धक्कादायक तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे.एका अल्पवयीन मतीमंद मुलीला फुस लावुन बांधकाम सुरु असलेल्या घरात घेवुन जात अत्याचार करू पाहणाऱ्या ५५ वर्षीय नराधमास एका चहा टपरी चालक महिलेच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला असल्याची घटना काल,बुधवारी १ ऑक्टोंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोरची शहरात घडली असून आज,गुरुवार २ ऑक्टोंबर रोजी सर्वत्र उघडकीस आली. बंडू सहारे वय ५५ वर्षे रा. हेटाळकसा,ता.कोरची, जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव असून प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन कोरची पोलीस स्टेशन येथे अपराध क्र.११७/२०२५ कलम ६४ (२) (आय),(के),६५ भारतीय न्याय सहिता सह कलम ४ (२),६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी बंडू सहारे हा काल बुधवारी दुपारच्या सुमारास कोरची शहरातून सायकल घेऊन एका अल्पवयीन मतीमंद मुलीला फुस लावुन बांधकाम सुरु असलेल्या घरात घेवुन जात असतांना एका टपरी चालक महिलेने बघितले.त्यानुसार रस्त्याने जात असलेल्या दोन आशा वर्कर यांना याबाबत माहिती दिली.लागलीच तिघीही बांधकाम सुरु असलेल्या घरात गेल्या असता आरोपी हा पिडीत अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग करतांना आढळून आल्याने पिडीतेला आरोपीच्या तावडीतून सोडवले.अश्यातच आरोपी बंडू सहारे हा आपल्या सायकलवर पळुन जात असतांना महिला व आशा वर्कर यांनी आरडाओरड केल्याने आजुबाजुला असलेल्या नागरिकांनी आरोपीस पकडले.त्यानुसार कोरची पोलिसांना माहिती देण्यात आली आणि एका अल्पवयीन मतीमंद मुलीला फुस लावुन तिच्या मानसिकतेचा फायदा घेवुन शारिरीक संबंध प्रस्तापित केले,अशी फिर्याद दिल्याने बंडू सहारे याचेवर कोरची पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कोरची ठाण्याचे एपीआय मुकुंद देशमुख करीत आहेत.
- Advertisement -

