Tuesday, May 26, 2026
Homeगोंदियादोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका १६ वर्षीय अल्पवयीन विधीसंघर्ष बालकाविरूध्द स्थानिक पोलिस स्टेशन येथे अपराध क्रमांक-२२६/२०२६ कलम ६४ (२)(आय),६४(२)(एम), ६५(२),३५१ (३)भारतीय न्याय संहिता,सहकलम ४,६,८ बाल वैज्ञानिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गोंदियाच्या बाल न्यायालयात नेण्यात आले.मीडिया रिपोर्टनुसार,सदरची घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या बोंडगाव देवी येथे २३ मे २०२६ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास  घडली.विशेष म्हणजे,घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने घडलेल्या प्रकरणाची माहिती तिच्या आईला सांगितल्याने सदर प्रकरणास वाचा फुटली आणि प्रकरण पोलिसांत पोहचले.त्यानुसार,२४ मे रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.१६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घराशेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व अत्याचार केला.संबंधित मुलीपैकी एकीचे वय अवघे ६ वर्षे ९ महिने,तर दुसरीचे वय १० वर्षे असून घटनेनंतर मुलींना कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे.यातील एक मुलगी ही आरोपीच्या नात्यातील असल्याचेही समोर आले आहे.त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.गावकऱ्यांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!