Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या नवीन बसस्थानकाचा मुहूर्तच सापडेना..!

देसाईगंजच्या नवीन बसस्थानकाचा मुहूर्तच सापडेना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज शहरातील गेली कित्तेक वर्षांपासून नवीन बसस्थानकाचा मुहूर्तच सापडत नसल्याने जुन्या बसस्थानकाच्या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

शहराच्या मुख्य मार्गावर असलेल्या जुन्या बसस्थानकावर महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहने उभी करण्यासाठी जागा उरत नाही.तसेच दुकानदारांचे अतिक्रमण वाढल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.परिणामी येथे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न जटील झाला आहे.मागील अनेक वर्षांपासून नव्या बसस्थानकाची मागणी होत असतांना बसस्थानक निर्मितीचा प्रश्न अडगळित पडला आहे.

येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम केव्हा होणार? याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.कित्येक वर्षांपासून मुख्य महामार्गावर असलेले बसस्थानक या ठिकाणी असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते.वाहतूक कोंडीमुळे शहरवासीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यातच परिवहन महामंडळाने बसफेऱ्या कमी केल्या असल्या तरी या परिसरात रोजच प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते.येथे मुख्य बाजारपेठ असून दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे.वाहनांची संख्याही दुपटीने वाढल्याने रस्ते कमी पडत आहेत.वर्दळीचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.

नवीन बसस्थानक सुरू झाल्यास वाहतुकीची कोंडी,प्रवाशांची होणारी गैरसोय व इतर समस्यांचे निराकरण होणार असल्याने देसाईगंज नवीन बसस्थानकाचे मुहूर्त लवकरात-लवकर काढावे.अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!