- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय,देसाईगंज येथील वाणिज्य शाखेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-२०२० नुसार बी.कॉम.सेमिस्टर १,३ व ५ च्या विद्यार्थ्यांसाठी FP(Field Project),RP (Research Project)व CEP(Community Engagement Project)या विषयांच्या प्रकल्प वहीची रचना,लेखन व सादरीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत वाणिज्य शाखाप्रमुख प्रा.डॉ.निलेश हलामी यांनी पीपीटी(PPT)सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रकल्प वही कशी तयार करावी, प्रकल्पाची उद्दिष्टे कशी निश्चित करावीत,विषयाची निवड,माहिती संकलन,क्षेत्रभेट, प्रश्नावलीचा वापर,माहितीचे विश्लेषण,निष्कर्ष व शिफारशी तसेच प्रकल्प अहवालाची मांडणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार करतांना शैक्षणिक शिस्त,अचूक माहिती संकलन आणि स्वतःच्या निरीक्षणाला महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा.अनिल होळी यांनीही विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या विविध टप्प्यांबाबत मार्गदर्शन केले.FP, RP व CEP या प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान न मिळता प्रत्यक्ष क्षेत्रातील समस्या,सामाजिक परिस्थिती आणि व्यावसायिक व्यवहार समजून घेण्याची संधी मिळते,असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेस वाणिज्य शाखेतील प्रा.जितेंद्र राऊत,प्रा. अतुल देशमुख व प्रा.अंकिता कान्होलकर यांची उपस्थिती होती.तसेच वाणिज्य शाखेतील बी.कॉम. सेमिस्टर १,३ व ५ चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना FP,RP व CEP प्रकल्पाची रूपरेषा,प्रकल्प वहीची मांडणी आणि प्रकल्प पूर्ण करण्याची प्रक्रिया याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले. वाणिज्य शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावहारिक कौशल्यविकासासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा उपयुक्त व मार्गदर्शक ठरली.
- Advertisement -

