Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या वतीने ‘आयकर क्षेत्रातील करिअर व स्वयंरोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आयकर क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधी,करसल्लागार सेवांचे महत्त्व आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या शक्यता याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.निलेश हलामी होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुराडे असोसिएशन देसाईगंज येथील ओमप्रकाश बुराडे व प्रा.अनिल होळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे आयकर व कर सल्लागार क्षेत्रातील व्यावहारिक कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ओमप्रकाश बुराडे यांनी सांगितले की,बदलत्या आर्थिक परिस्थितीत आयकर, लेखा,कर नियोजन आणि आर्थिक सल्लागार सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.व्यक्ती,व्यापारी,उद्योजक तसेच विविध व्यावसायिक संस्थांना करासंबंधी सेवा आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते.त्यामुळे या क्षेत्रात योग्य ज्ञान,आवश्यक कौशल्ये आणि व्यावहारिक अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगारासोबतच स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
आयकर विवरणपत्र भरणे,करदात्यांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे,आर्थिक नोंदींचे व्यवस्थापन,लेखा सेवा,करनियोजन,जीएसटीविषयक कामकाज आणि कर सल्लागार कार्यालयातील सहाय्यक कामे अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांना करिअर घडविता येऊ शकते.अनुभव आणि आवश्यक व्यावसायिक पात्रता प्राप्त केल्यानंतर या क्षेत्रात स्वतंत्र सेवा व्यवसाय उभारण्याचाही विचार करता येतो,असे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून प्रत्यक्ष कामकाजाचे ज्ञान,करप्रणालीतील बदलांची माहिती आणि डिजिटल साधनांचा वापर करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.आयकर व जीएसटीसंबंधी नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असल्याने सतत अध्ययन करणे, अद्ययावत माहिती मिळविणे आणि कामात अचूकता राखणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
आजच्या डिजिटल युगात कर व लेखा क्षेत्रातील बहुतांश कामकाज संगणकाच्या साहाय्याने केले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी संगणकीय लेखांकन,स्प्रेडशीटचा वापर, ऑनलाइन करप्रणाली,डिजिटल कागदपत्रे आणि आर्थिक माहितीचे योग्य व्यवस्थापन यांसारखी कौशल्ये आत्मसात करावीत,असे मार्गदर्शन करण्यात आले.
ग्राहकांशी प्रभावी संवाद साधणे,आर्थिक माहिती गोपनीय ठेवणे,कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे, निर्धारित मुदतीत काम पूर्ण करणे आणि व्यावसायिक नैतिकतेचे पालन करणे या बाबी करसल्लागार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या आहेत.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच या कौशल्यांचा सराव करावा आणि प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळविण्याचा प्रयत्न करावा,असे बुराडे यांनी सांगितले.
विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना प्रा.डॉ.निलेश हलामी यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करण्यापुरते मर्यादित न राहता रोजगाराभिमुख कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करावा,असे आवाहन केले.वाणिज्य शिक्षणाचा प्रत्यक्ष व्यावसायिक क्षेत्राशी संबंध जोडल्यास विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी करता येऊ शकतो,असे त्यांनी नमूद केले.
आयकर,लेखांकन,जीएसटी आणि आर्थिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाशी संबंधित कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांना विविध संस्थांमध्ये नोकरीच्या संधी शोधता येतात.त्याचबरोबर अनुभव,आवश्यक पात्रता आणि व्यावसायिक नियमांचे पालन करून स्वतंत्र सेवा व्यवसाय उभारण्याची दिशाही मिळू शकते.आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा अभ्यास करून स्वतःची क्षमता ओळखावी आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी,असेही त्यांनी सांगितले.
या मार्गदर्शन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आयकर क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा, स्वयंरोजगाराच्या संधी,आवश्यक व्यावसायिक पात्रता आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे हा होता.कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच आयकर व करसल्लागार क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची ओळख झाली.तसेच भविष्यात कर व लेखा क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी कोणत्या कौशल्यांवर भर द्यावा,याबाबत त्यांना उपयुक्त दिशा मिळाली.
प्रा.अनिल होळी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम.अंतिम वर्षाची विद्यार्थिनी पूर्वा राऊत हिने केले,तर कैकशा पठाण हिने उपस्थितांचे आभार मानले.यावेळी वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.जितेंद्र राऊत,प्रा.अतुल देशमुख,डॉ.अंकिता कान्होलकर यांच्यासह पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक जाणीव निर्माण होण्यास,रोजगाराच्या नव्या संधींचा शोध घेण्यास आणि स्वयंरोजगाराबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. शिक्षण आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्र यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!