Wednesday, August 19, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४६ प्रकरणे निकाली.. - विविध प्रकरणात ३...

देसाईगंज न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ४६ प्रकरणे निकाली.. – विविध प्रकरणात ३ लाखाच्यावर दंड वसूल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-न्यायालयात वेळ व पैश्याची बचत व्हावी तसेच गोर-गरीब तथा सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकरणातील वाद सलोख्याने वा सामोपचाराने मिटविता यावीत; यासाठी राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्या आदेशान्वये आज,शनिवार १४ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास तालुका विधी सेवा समिती देसाईगंज न्यायालया अंतर्गत खटला पुर्व प्री लिटीगेशन प्रकरणे,नियमित दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली.यात ४६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील वाद समोपचार व सलोख्याने मिटविण्यासाठी आज तालुका दिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्तर देसाईगंज (वडसा)येथिल मध्यस्थी केंद्रात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्री लिटीगेशनच्या ८ तर नियमित फौजदारी खटला तसेच दिवाणी प्रकरणाचे ३८ प्रकरणे असे एकुण ४६ प्रकरणांचा समोपचार व सलोख्याने निकाली काढण्यात आले. यात ३ लाख ९ हजार ७७६ रुपये वसूल करण्यात आले.सदर राष्ट्रीय लोक अदालतीला दिवाणी व फौजदारी न्यायालय देसाईगंजचे न्यायाधिश सतीश गोरे,पॅनल अधिवक्ता म्हणून ॲड.दत्ता पिलारे, ॲड.संजय गुरू व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज न्यायालयातील वरिष्ठ लिपिक चेतन भुर्रे,कनिष्ठ लिपीक प्रविण माटे,कनिष्ठ लिपीक मिलींद तिलमलवार,कनिष्ठ लिपीक सौ.आर आर परसा, शिपाई एस.एल.दोनाडकर यांनी सहकार्य केले.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा देसाईगंज,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देसाईगंज व शंकरपुर,बँक ऑफ इंडीया शाखा देसाईगंज,युनियन बँक ऑफ इंडीया शाखा देसाईगंज, आयडीबिआय बँक शाखा देसाईगंज,कुरुड,सावंगी, संस्कार को-ऑपरेटीव्ह बँक शाखा देसाईगंज, गृहलक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बँक शाखा देसाईगंज व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय देसाईगंज यांच्या सह अर्जदार व गैरअर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित.. आता सर्पदंशाची प्रत्येक घटना,विषप्रतिबंधक लसीचा साठा,केलेले उपचार व मृत्यूची नोंद करणे बंधनकारक..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!