Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील रोजगार हमीच्या कामांना लागले ग्रहण -  जेमतेम बोटावर...

देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील रोजगार हमीच्या कामांना लागले ग्रहण –  जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच कामे सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या यंत्रणा स्तरावरील कामांना हल्ली ग्रहण लागले आहे.देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील कामे जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच सुरू असल्याने तालुक्यातील संपूर्ण गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी.अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर,डोंगरगांव व बोळधा या ठीकाणी यंत्रणा स्तरावरील केवळ तीन ते चारच कामे सुरू असून कोंढाळा,कुरुड,चोप,मोहटोला,आमगाव,गांधीनगर,विसोरा,उसेगाव,कोकडी,तुळशी,पोटगांव,कसारी,अरततोंडी,पिंपळगाव,शंकरपूर व इतर गावांमध्ये यंत्रणेची एकही कामे सुरू नसल्याने मजूर वर्ग रोजगाराच्या शोधात भटकंती करतांना दिसून येत आहेत.रोजगार हमी योजनेची कामे दोन स्तरावर केली जातात.एक यंत्रणा स्तर तर दुसरे पंचायत स्तर; यामध्ये यंत्रणा स्तरावर वन विभाग,इटीयाडोह विभाग,कृषी विभाग,सिंचाई विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग तर पंचायत विभाग स्तरावर ग्रामपंचायतीच्या मार्फतीने रोजगार हमीची कामे गावातील मजुरांदद्वारे केली जातात.मजुरांद्वारे केल्या जाणाऱ्या कामांना अकुशल तर इतर साहित्यांची कामे करून घेण्यास कुशल कामे म्हटले जाते.

यंत्रणा स्तरावर ५० टक्के तर पंचायत स्तरावर ५० टक्के कामे केली जातात.मात्र हल्ली देसाईगंज तालुक्यातील गावांमध्ये अकुशल कामांचा थांगपत्ताच लागत नाही.तालुक्यात एवढी मोठी यंत्रणा असून रोजगार हमीची कामे सुरू कां बरं केली जात नाही?याचे नवल वाटत आहे.शासन स्तरावरून एका वर्षात एका कुटुंबातील सदस्यांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली जाते.मात्र १०० दिवस तर सोडा साधे एका कुटुंबाला साधे ५० दिवस सुध्दा काम दिले जात नाही.यंत्रणा स्तरावर रोजगार हमीची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे.गेली १० वर्षापूर्वी कुशल प्लस अकुशल मिळून भरपूर कामे केली जायची व गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळायचा; मात्र अलीकडे कुशलचा निधी चार ते पाच वर्षे मिळत नसल्याने भरपूर प्रमाणात रोजगार हमीची कामे होतांना दिसून येत नाही.डिगीमडागिम केवळ शासनास दाखविण्याकरिता कामे केली जात आहेत.

यामुळेच ‘रोजगाराची हमी,कामाची कमी’ असे झाले असल्याने; याकडे लक्ष घालून तालुक्यातील सर्वच गावात रोजगार हमीची कामे सुरू करून गावातील कुटुंबातील सदस्यांना रोजगार द्यावा;अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!