उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७७ धावांवर रोखल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी ७ बाद ३२१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने शतक तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी अर्थशतकी खेळी केली.आता तिसऱ्या दिवशी या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.
पहिला धक्का-
अश्विनने सलामीवीर उस्मान ख्वाजाला ५ धावांवर बाद केले, ऑस्ट्रेलिया १ बाद ७
ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात
भारताचा ४०० धावांवर ऑलआउट
भारताने पहिल्या डावात ४०० धावा केल्या,अक्षर पटेल ८४ धावांवर बाद झाला; भारताने पहिल्या डावात २२३ धावांची आघाडी घेतली
भारताची नववी विकेट
मोहम्मद शमी ३७ धावांवर बाद,भारत ९ बाद ३८०
भारताची आघाडी २००च्या पुढे
जडेजा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या मोहम्मद शमीने अक्षर पटेल सोबत दमदार भागिदारी केली आणि संघाला २००च्या पुढे आघाडी मिळून दिली.
भारताची आठवी विकेट
रविंद्र जडेजा ७० धावांवर बाद झाला, मर्फीने घेतली विकेट, भारत ८ बाद ३२८
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल जोडी मैदानात
ऑस्ट्रेलियाच्या डावात ५ विकेट घेणाऱ्या रविद्र जडेजाने अक्षर पटेल सोबत आठव्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी केली आहे.जडेजा ६६ तर पटेल ५२ धावांवर खेळत आहे.

