Friday, September 4, 2026
Homeगोंदियादुपारचे जेवण सुरू असतांनाच मृत्यूने कवटाळले; पोलीस हवालदाराचा मृत्यू..!

दुपारचे जेवण सुरू असतांनाच मृत्यूने कवटाळले; पोलीस हवालदाराचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-माझे-माझे म्हणून अनेकांना दुनिया भराची हाव सुटलेली आहे.हितभर जागा असो,नाहीतर शेतीची, घराची हिस्सेवाटणी असो,ते घेतल्याशिवाय अनेकांची भूक भागत नसते.त्यातच पैसा म्हटला तर  हात पुढे करणाऱ्यांची संख्या कमी नाही.एवढे करूनही शरीरावर परिधान केलेल्या वस्त्राशिवाय मरणोत्तर कुणीही काहीही घेऊन जात नाही.मृत्यू कुणाला सांगून येत नाही,तर चालता-बोलता ‘राम नाम सत्य’ होत असते.एखादा अपघात वा एखादा आघात हा मृत्यू कवटाळण्यासाठी निमित्त असतो.असाच काहीसा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे.देवरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५७ वर्षीय पोलिस हवालदार यांचे दुपारचे जेवण सुरू असतांनाच त्यांना मृत्यूने कवटाळले असल्याची दुःखद घटना २१ ऑक्टोंबर २०२५ रोजी देवरी तालुक्याच्या नारायणनगर,आमगाव येथे घडली.राधेश्याम रामप्रसाद कुंभरे रा.नारायणनगर,आमगाव असे मृत पावलेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून ते  मंगळवारी आपल्या राहत्या घरी दुपारच्या सुमारास जेवण करीत होते.जेवण करत असतांनाच अचानकपणे त्यांच्या छातीत दुखू लागले.छातीत दुखणे सुरू झाल्याने छातीला हात लावत जेवण करतांना जाग्यावरच बेशुद्ध पडले.कुटुंबीयांनी लागलीच राधेश्याम यांना तात्काळ आमगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,तोपर्यंत उशीर झाला होता.तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती राधेश्याम यांना मृत घोषित केले.प्रकरणी आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार विनोद कुंभरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!