Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरदुकानफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक; एक फरार..

दुकानफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक; एक फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-मध्यरात्रीच्या सुमारास दोन दुकानांचे शटर तोडून १६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात भिसी पोलिसांना यश आले आहे.यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.चिमूर तालुक्यातील भिसी शहरात ३ ऑक्टोंबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शनिवार पेठ, भिसी येथील राकेश विजय खोब्रागडे दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून काउंटरमधील ७ हजार ३०० रुपये चोरी केले.त्याच वेळी शेजारील श्रीकांत सोहनलाल ठोंबरे यांच्या मालकीच्या “शरण्या इलेक्ट्रिकल्स” दुकानाचे सुद्धा लॉक तोडून,आत प्रवेश करत तीन नग टेबल फॅन(किंमत ७ हजार ५००)आणि रोख १ हजार ५०० रुपये असा एकूण १६ हजार ३०० चा मुद्देमाल चोरीला गेला होता.त्यानुसार,राकेश विजय खोब्रागडे यांनी भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.अश्यातच ४ ऑक्टोंबरच्या रात्री गावातील काही नागरिकांना  प्रज्वल उर्फ नागेश वामण तुबेकर याला संशयास्पदरीत्या भटकतांना पाहिले. त्यास थांबवून विचारपूस करण्यात आली असता,त्याच वेळी पोलीस स्टेशन भिसीचे पेट्रोलिंग स्टाफ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला ताब्यात घेतले.सखोल चौकशीत त्याने तसेच त्याचे साथीदार दीपक संजय छापेंकर आणि आयुष उर्फ गट्टू खोब्रागडे यांनी मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली.त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी दीपक छापेंकरला अटक केली,तर तिसरा आरोपी आयुष खोब्रागडे सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले असून शोधमोहीम सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!