Wednesday, August 26, 2026
Homeनागपूरदारूचा घोट घेत चक्क बिअर बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फायलींवर केल्या...

दारूचा घोट घेत चक्क बिअर बारमध्ये बसून महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फायलींवर केल्या भराभर सह्या..! – अखेर ठेकेदाराला धरुन दारू ढोसणारा उपविभागीय अभियंता निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा असल्याने अनेकजण कुटुंबीयांसोबत वेळ किंवा मित्रांसोबत गप्पा मारून दोन दिवस मौज-मजा करण्यात घालवतात.मात्र,रविवारच्या सुट्टीत नागपूरच्या मनीष नगरातील कीर्ती रेस्टॉरंट अँड बारमध्ये जे चित्र दिसले,ते अनेकांचे डोळे पांढरे करणारे होते.भर दुपारी गजबजलेल्या कीर्ती बारमध्ये दारूचे घोट घेत तीन व्यक्ती चक्क महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बसले होते. धक्कादायक बाब म्हणजे,त्यापैकी एकजण भराभर त्या फायलींवर सह्या करत होता.या प्रकाराने बारमधील उपस्थितांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
आँखो देखा हाल बघणाऱ्यांनी,दुपारी ३.३० च्या सुमारास तीन व्यक्ती मनीष नगरातील बिअर बारमध्ये आलेले बघितले.त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा एक मोठा गठ्ठा ठेवला.जवळपास तासभर त्यांच्यात या फायलींवरून गंभीर चर्चा सुरू होती.ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होती,हे स्पष्ट होऊ शकले नाही.परंतु,चर्चेनंतर एका व्यक्तीने महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फायलींवर भराभर सह्या करण्यास सुरुवात केली.बिअर बारसारख्या ठिकाणी शासकीय कामकाजाच्या फायली घेऊन चर्चा करणे आणि त्यावर सह्या करणे हे शासकीय नियमांचे उल्लंघन नाही का? असा संतप्त प्रश्न निर्माण झाला.शासकीय कामकाजाची गोपनीयता आणि नियमांनुसार कामकाज करण्याची अपेक्षा असतांना,अशा प्रकारे बिअर बारमध्ये दारूचा घोट घेत उघडपणे फायलींवर सह्या करणे निश्चितच गंभीर स्वरूपाचे असल्याने महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल क्लिअर करण्याचे काम सुरु असल्याचा व्हिडीओ रविवार २७ जुलै २०२५ रोजी समोर आला.सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये टेबलावर तिघेजण बसलेले दिसतात.या टेबलावर महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फाईल्स दिसतात.या फाईली पाहतांना ते काय काम करत होते,याविषयी चर्चा सुरु झाली.हे अधिकारी गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात होते.या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.व्हिडीओ समोर येताच या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के वय ५७ वर्षे यांनी बिअर बारमध्ये सरकारी काम करत असल्याचे आणि ठेकेदाराला धरुन दारू प्राशन केल्याचे उघड झाल्याने आज,मंगळवार २९ जुलै रोजी देवानंद सोनटक्के यांना शासनातर्फे निलंबित करण्यात आले आहे.देवानंद सोनटक्के हा चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ येथे कार्यरत आहे.
महत्वाचे म्हणजे,गडचिरोलीचा अधिकारी चक्क नागपूरच्या बारमध्ये शासनाच्या फायली घेऊन सह्या करतोय,ही किती लाजिरवाणी बाब आहे.म्हणूनच म्हणतात की, ‘गडचिरोली जिल्हा अन् खादाळावर भिल्ला’ या ठिकाणी येणारे काहीजण सोडलेत तर ‘माल सुतावो’ अशी भूमिका घेतांना दिसून येत आहेत.त्यांना जील्हाचा विकास नाही तर आपला विकास कसा होईल,याकडे ते बघत असतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!