Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीआज आदिवासी लाभार्थी मेळावा व वसतीगृह इमारतींचे लोकार्पण सोहळा..!

आज आदिवासी लाभार्थी मेळावा व वसतीगृह इमारतींचे लोकार्पण सोहळा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली,अहेरी व भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत लाभार्थी मेळावा व नवीन इमारतीचे आभासी पद्धतीने(व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा आज,बुधवार ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील गडचिरोली शहराच्या आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी विशेष अतिथी म्हणून वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक,आमदार सुधाकर अडबाले,अभिजित वंजारी,धर्मरावबाबा आत्राम, डॉ.मिलिंद नरोटे व रामदास मसराम तसेच आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे,आयुक्त लीना बनसोड,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम व्यवस्थापन कक्षाचे मुख्य अभियंता आबासाहेब नागरगोजे उपस्थित राहणार आहेत. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत कार्यालयीन इमारत,शालेय इमारत व मुलींचे वसतीगृह,गडचिरोली प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा सोडे,रेगडी,कारवाफा येथील मुला- मुलींचे वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा यासोबतच शासकीय आश्रम शाळा घाटी,येरमागड,भाडभिडी, अंगारा येथील मुला-मुलींचे वसतीगृह,अहेरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा बाम्हणी, गुड्डीगुड्डम येथील मुला-मुलींचे वसतीगृह,भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा कोठी,जांबीया येथील मुलांच्या वसतीगृह आदी बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 सदरच्या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली),कुशल जैन (अहेरी),नमन गोयल(भामरागड) व सार्वजनिक बांधकाम (आदिवासी)विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन मुत्यालवार यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!