- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ताजा,नगदी व तात्काळ पैसा देणारे दागिने म्हणजे सोने-चांदी.तुम्ही पैश्याची कुठेही गुंतवणूक करा,पण सोने-चांदी सारखे वेळेवर हाळोख दूर करणारे व जलद निवारण करणारे दुसरे कुणीही नाही. मात्र,बऱ्याच महिन्यांपासून सोने-चांदी भाव खाऊ लागली आहे.दररोज दोघांच्याही किंमती चढ- उतार करीत आहेत.सध्या स्थितीत सोने आणि चांदीच्या किंमतीत दर घसरू लागले असले तरीही अद्याप सोने-चांदीची खरेदी सर्वसामान्यांसाठी आवाक्याबाहेरच आहे.कारण की,२४ कॅरेट सोन्याच्या दरात ३ टक्के जीएसटी जोडल्यावर किंमत पुन्हा लाखाच्या पुढे जाते,त्यामुळे दागिने खरेदी करणे अनेकांसाठी स्वप्नवतच ठरत आहे.काल गुरुवारी आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात,विशेषतः नागपूरमध्ये सोने-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली.२४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारच्या तुलनेत तब्बल १,७०० रुपयांनी कमी झाले,तर चांदीच्या दरात ९०० रुपयांची घट झाली.
बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ९०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता,जो काल गुरुवारी ९९ हजार २०० रुपयांवर आला.चांदीचा दर १ लाख १६हजार ७०० रुपये प्रति किलोवरून १लाख १५ हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आला.काल गुरुवारी सोन्याच्या दरात दोन टप्प्यांत घसरण झाली.सकाळच्या सत्रात १,४०० तर दुपारच्या सत्रात ३०० रुपयांची घट नोंदवली गेली.दर घसरले असले तरी प्रचंड दरवाढीमुळे सोने-चांदीची खरेदी अद्याप सामान्य ग्राहकांसाठी आवाक्याबाहेरच आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

