Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'तुम्ही कलेक्टर आहात काय?' मनाला बोचरी टोचली अन् सिधा कलेक्टरच बनला..!

‘तुम्ही कलेक्टर आहात काय?’ मनाला बोचरी टोचली अन् सिधा कलेक्टरच बनला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कुटुंबात अठराविश्र्व दारिद्र्य,आई रोजगार हमी योजनेच्या कामावर जायची तर वडील शेतात राबून संसाराचा गाडा हाकत उदरनिर्वाह चालवायचे.त्यातच ज्याने कधी स्वप्नातही कलेक्टर(जिल्हाधिकारी)हा शब्द ऐकला नव्हता, अश्या शेतकऱ्याच्या मुलाने कठोर परिश्रम घेत गगनासही ठेंगणे केले आहे.राजस्थानमधील हनुमानगड येथील हेमंत पारीक असे कलेक्टर झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हेमंतची आई गाव परिसरात सुरू असणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामावर जायची.रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यावेळी जेमतेम दोनशे रुपये मजुरी मिळायची.मात्र,कामावरील मोजमापनुसार मजुरी ही कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये पडायची व तितकीच मजुरी खात्यावर जमा व्हायची.त्यामुळे हेमंतच्या आईने याबाबत मुलास सांगितले.हेमंतने एवढी कमी मजुरी मिळत असल्याने संबंधित यंत्रणेला जाब विचारला असता,यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘तुम्ही कलेक्टर आहात का?’ असे विचारून हेमंतला तिथून हाकलून लावले.त्या दिवसाआधी हेमंतने कलेक्टर हा शब्दही ऐकला नव्हता.पदवीनंतर नोकरी करून घराची जबाबदारी सांभाळण्याचा हेमंतचा हेतू होता,पण आईला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहिले.त्यातच त्याच्या मनाला बोचरी टोचली
अन् सिधा कलेक्टरच बनला.
हेमंतचा जन्म राजस्थानमधील हनुमानगड येथील एका गरीब कुटुंबात झाला.त्याने महर्षी दयानंद शाळेतून हिंदी माध्यमात दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर बारावी केली.हेमंतने जेईटी परीक्षा दिली आणि त्यात तो नापास झाला.पुढच्या वर्षी पुन्हा जेईटीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला.पण सुरुवातीचे शुल्क भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.
आयसीएआर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर,त्याला जयपूरमधील जोबनेर येथील नरेंद्र कृषी विद्यापीठात प्रवेश मिळाला.काही यूट्यूब चॅनेल्सच्या लिंक्स पाहून हेमंतला कळले की आयएएस मधून कलेक्टर बनता येते,मग त्याच दिवशी त्याने ठरवले की एक दिवस कलेक्टर होणार.पण सर्वात मोठी समस्या म्हणजे आयएएसची तयारी करण्यासाठी पैसे नव्हते,वडील म्हणाले की,तू दिल्लीला जा आणि मनापासून अभ्यास कर,आपण घर विकू.त्या दिवसापासून हेमंतने UPSC-IAS ची तयारी सुरू केली,त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाला आणि नाव यादीत आले.सततच्या कठोर परिश्रमानंतर, त्याने २०२३ च्या यूपीएससीमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया ८८४ रँक मिळवला. कुठलेही ध्येय गाठायचे असेल तर परिस्थितीचा सामना करण्यासाठी शिका, अथक परिश्रमातून यश हे एक दिवस आपोआप पदरात पडल्याशिय राहणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!