Thursday, June 25, 2026
Homeकुरखेडातीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांवर हल्ला अन् बिबट्या विहिरीत पल्ला…-कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला...

तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांवर हल्ला अन् बिबट्या विहिरीत पल्ला…-कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा (गडचिरोली):-आधी गायीवर हल्ला, त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांची शिकार करण्यासाठी झेपावलेला बिबट्या विहिरीत कोसळला.सदरची घटना कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथे काल,१६ जुलै रोजी पहाटे घडली. दरम्यान,बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वन विभाग कामाला लागला.

जोशीटोला गावात रघुनाथ बनसोड यांचे घर आहे.तेथेच त्यांची विहीर असून,जवळच गुरांचा गोठाही आहे.१६ जुलै रोजी पहाटे दोन वाजता बिबट्याने त्यांच्या गोठ्यातील गायीवर हल्ला केला.यात गाय जखमी झाली.त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडला.बिथरलेल्या बिबट्याने नंतर शेळ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र,याचदरम्यान अंधारात तो विहिरीत कोसळला.पहाटे ही बाब शेतकरी बनसोड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाला संपर्क केला.

सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.दरम्यान,वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा बोलावला.मात्र, विहिरीचा आकार अवघ्या चार फुटांचा आहे.त्यामुळे पिंजरा आत सोडणे कठीण बनले होते.बिबट्यासाठी लाकडी पाट सोडण्यात आला; पण तो पाइपला बिलगून बसला.नंतर छोटा पिंजरा मागवला.देसाईगंज येथील वन विभागाच्या बचाव पथकाने या विहिरीत पिंजरा सोडला व बिबट्या त्यात अलगद अडकला.त्यानंतर त्याची पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!