Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीछत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी साखळी उपोषण…

छत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रम्हपुरी जिल्हा निर्मितीसाठी साखळी उपोषण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- गेल्या चाळीस वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे,या मागणीसाठी सतत आंदोलने करण्यात आली.मागील एक वर्षापासून जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.याच अधिवेशनात नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीसाठी दांगट समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्याबरोबर ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती जिल्ह्याच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाली असून मंगळवार दि.१५ जुलैपासून ब्रम्हपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.उपोषण २३ जुलैपर्यंत सुरू राहणार असून मंगळवारी (दि.१५ जुलै पासून प्रा.देविदास जगनाडे,डॉ.प्रेमलाल मेश्राम,राजू भागवत,विनोद झोडगे,प्रशांत डांगे अविनाश राऊत, दत्तू टिकले,मंगेश फटिंग,सुनील विखार,रमेश गणवीर, दीपक नवघडे उपोषणाला बसले आहेत.ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!