Wednesday, October 21, 2026
Homeकुरखेडातीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांवर हल्ला अन् बिबट्या विहिरीत पल्ला…-कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला...

तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांवर हल्ला अन् बिबट्या विहिरीत पल्ला…-कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा (गडचिरोली):-आधी गायीवर हल्ला, त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांची शिकार करण्यासाठी झेपावलेला बिबट्या विहिरीत कोसळला.सदरची घटना कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथे काल,१६ जुलै रोजी पहाटे घडली. दरम्यान,बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वन विभाग कामाला लागला.

जोशीटोला गावात रघुनाथ बनसोड यांचे घर आहे.तेथेच त्यांची विहीर असून,जवळच गुरांचा गोठाही आहे.१६ जुलै रोजी पहाटे दोन वाजता बिबट्याने त्यांच्या गोठ्यातील गायीवर हल्ला केला.यात गाय जखमी झाली.त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडला.बिथरलेल्या बिबट्याने नंतर शेळ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.मात्र,याचदरम्यान अंधारात तो विहिरीत कोसळला.पहाटे ही बाब शेतकरी बनसोड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाला संपर्क केला.

सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.दरम्यान,वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा बोलावला.मात्र, विहिरीचा आकार अवघ्या चार फुटांचा आहे.त्यामुळे पिंजरा आत सोडणे कठीण बनले होते.बिबट्यासाठी लाकडी पाट सोडण्यात आला; पण तो पाइपला बिलगून बसला.नंतर छोटा पिंजरा मागवला.देसाईगंज येथील वन विभागाच्या बचाव पथकाने या विहिरीत पिंजरा सोडला व बिबट्या त्यात अलगद अडकला.त्यानंतर त्याची पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!