Friday, May 1, 2026
Homeगोंदियापावसाने दीड तास अर्जुनी मोरगाव तालुक्याला काढले झोडपून…-जनजीवन विस्कळीत…

पावसाने दीड तास अर्जुनी मोरगाव तालुक्याला काढले झोडपून…-जनजीवन विस्कळीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले.सतत मुसळधार पावसाने परिसरात पाणीच पाणी अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती.दरम्यान महागाव ते मोरगाव मार्गावरील शिरोली जवळ असलेल्या नाल्याला पुर आल्याने रस्ता बंद पडला होता.त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची चांगलीच कोंडी झाली होती.रहदारी ठप्प पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.दमदार पावसाने झोडपून काढल्याने नागरिकांची एकच दाणादाण उडाली.दरम्यान पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर सर्वसामान्य ही सुखावला.मुसळधार पावसाने महागाव ते मोरगाव अर्जुनी मार्गावर शिरोली गावशिवारातून वाहत असलेल्या नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प पडली होती.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/पिंपळगाव येथे विज पडल्याने म्हैस जागीच ठार झाली.सदरच्या घटनेत पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम यांचे नुकसान झाले आहे.सायंकाळच्या सुमारास खांबी/पिंपळगाव परिसरात अचानक वातावरणात बदल होवून पावसाला सुरूवात झाली.विजेच्या कडकडाट असतानाच पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम याच्या अंगणात बांधलेल्या म्हशीवर विज पडल्याने जागीच ठार झाली. या घटनेत पशुपालकाचे १ लाखाचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी केली आहे.या परिसरात सुमारे दीड तास मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने महागाव-शिरोली रस्ता बंद झाला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!