- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर-तळोधी मार्गावरील अडेगाव फाटा ते सारंगड मार्गावर ताडोबाकडे निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाने चिमूर आगाराच्या बसला मागून जोरदार धडक दिल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली,यामुळे बस पलटी होता-होता थोडक्यात बचावली.त्यातच पर्यटकांचे झायलो चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली उतरून बंद पडल्याने मोठी जीवितहानी टळल्याची घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. जीवितहानी तर टळली,मात्र बस आणि झायलोचे मोठे नुकसान झाले आहे.
झायलो या चारचाकी वाहनाने चार पर्यटक नागपूरहून चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे निघाले होते.तर एमएच ४०-एन ९५१३ क्रमांकाची चिमूर आगाराची बस तळोधीवरून अडेगाव फाटा ते सारंगड मार्गाने परत येत असतांनाच सदरचा अपघात घडला. झायलो वाहन चालत्या बसला मागून धडकल्याने धडाम असा आवाज झाला.यामुळे बस चालक गोंधळला आणि प्रवाशी घाबरले.बस झाडाला जाऊन धडकली आणि जाग्यावरच थांबली.सुदैवाने बस मधील प्रवाशी व चारचाकी वाहनातील पर्यटक थोडक्यात बचावले.घटना घडताच मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केल्याने तब्बल अर्धा तास मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.लागलीच घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तळोधी,भिसी व चिमूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून झायलो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

