Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततलाठी सापडला खरी; पण हुशारकीच केली लयभारी..!

तलाठी सापडला खरी; पण हुशारकीच केली लयभारी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आम्ही नेहमी म्हणत असतो की,देशात धुरंदर लोकांची कमीच नाही.तुम्ही दोन पटीने पुढे असाल,तर समोरील व्यक्ती चार पटीने दिमागाला जोर लावून पळवाटा शोधत असतो.त्यामुळे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे,असे नेहमीच होत असते. त्यातच एक मजेशीर घटना उघडकीस आली असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागली आहे.घटनेत तलाठी सापडला खरी; पण हुशारकीच केली लयभारी,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.कारणही तसेच आहे.सर्वप्रथम तलाठी याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपये घेतले.दोन हजार रुपये देताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली.धाड पडताच तलाठ्याने पाचशे रुपयांच्या चारही नोटा गिळंकृत केल्या.त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मोठ्या पेचप्रसंगात पडला.कारण नोटा असल्याशिवाय कारवाई कशी करायची? अशातच पोलिसांनीही हुशारी दाखवत सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मात्र,डॉक्टरांनी एंडोस्कोपी तपासणीचा सल्ला दिला.त्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात नेले असता अल्ट्रासाऊंड तपासणीतही नोटा आढळून आल्या नाहीत.रेडिओलॉजिस्टने पुन्हा एंडोस्कोपी तपासणीची शिफारस केली.त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी देहरादूनला हलवण्यात आले.दरम्यान, नोटा गिळण्याची घटना इतकी फास्ट घडली की अधिकारीही काहीही करू शकले नाहीत. यानंतर सबळ पुरावे मिळावेत म्हणून तलाठ्याला तात्काळ रुग्णालयात नेऊन सिटी स्कॅन करण्यात आले.परंतु, सिटी स्कॅनमध्येही पोटात नोटा दिसून न आल्याने प्रकरणात थेट पुराव्याअभावी आरोपीला सोडण्यात आले.अजब तलाठ्याची गजबची घटना ही उत्तराखंडमधील देहरादून जिल्ह्यातील कालसी तहसीलमध्ये कोटी डिमोऊ भागात तैनात असलेला तलाठी गुलशन हैदर याच्या बाबतीत घडली.याने तक्रारदाराच्या चुलत भावांसाठी आवश्यक असलेल्या मूलनिवास व जातीच्या दाखल्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती.त्यानुसार सापळा रचला गेला,पण तलाठ्याच्या हुशारीने बचाव झाला.मात्र,लाच प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

  •                         व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!