- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.तसेच रोख रकमेसह एकूण १६ लाख ५१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.नागपूर गुन्हे शाखेला शांतीनगरमधील दलाल चौक परिसरातील एका बंदिस्त टीनाच्या शेडमध्ये अंमली पदार्थांची मोठी खेप आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.यावेळी शेख जावेद वल्द शेख मुन्ना राहीन आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी या दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली.दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून १३ लाख ७४ हजार ९५० रुपये किंमतीचा सुमारे ५५ किलो गांजा जप्त केला. याव्यतिरिक्त,आरोपींच्या अंगझडतीमधील १ लाख ३५ हजार ५७० रुपयांची रोख रक्कम,एक लाख रुपये किंमतीची सुझुकी बर्गमन मोपेड,दोन इलेक्ट्रिक वजनकाटे आणि २६ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,गेल्या काही महिन्यांपासून नागपूर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.सदरची कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात आहे.
- Advertisement -

