Sunday, July 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततब्बल १६ वर्षांनी होणार जातनिहाय जनगणना; 'या' तारखेपासून होणार सुरुवात..

तब्बल १६ वर्षांनी होणार जातनिहाय जनगणना; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-जातनिहाय जनगणना दर दहा वर्षांनी घेतली जावी,अशी कायदेशीर तरतूद आहे.मात्र,केंद्र सरकारने नुकतेच जनगणना घेण्यासंदर्भात माहिती दिली होती.त्यामध्ये,जातनिहाय जनगणना घेण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले होते.बुधवार ३० एप्रिल २०२५ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली होती.पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय  जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सर्वंकष माहिती जाहीर केली होती.त्यामुळे येत्या काळात जातनिहाय  जनगणना  झाल्यास एकूण जाती,हल्ली दिलेले आरक्षण व इतर सर्व बाबी स्पष्ट होऊन अनेकांवर होणारा अन्याय संपुष्टात येणार आहे.त्यानुसार आता जनगणना करण्याची तारीख पुढे आली असून देशात १ मार्च २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. देशभरात दोन टप्प्यात ही जनगणना केली जाणार असून डोंगराळ भागात म्हणजेच लडाख,जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथून सुरुवात होणार आहे.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,तसेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांत विशेष बाब म्हणून १० ऑक्टोंबर २०२६ ला जनगणना सुरू होणार आहे.देशात या अगोदरची जनजगणना काँग्रेस सरकार असतांना झाली होती.सन २०११ मध्ये देशात जनगणना झाली होती.त्यानंतर २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते.मात्र,देशभरात कोरोनाची महामारी असल्याने २०२१ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय झाला नाही.त्यामुळे, आता २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होत असल्याने तब्बल १६ वर्षांनी जातनिहाय जनगणना होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!