- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा येथे आज,मंगळवार १७ डिसेंबरला सकाळच्या सुमारास अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी सामूहिक वनहक्क समिती व ग्रामस्थांची सामूहिक वनहक्क क्षेत्रातील विकास,वाढ आणि गावातील लोकांना रोजगार,वनउपज संपत्तीचे जतन करण्यासाठी मार्गदर्शनपर बैठक पार पडून सामूहिक वनहक्क समिती माध्यमातून विकासाकडे वाटचाल आणखी गतिमान कशी करता येईल,याकडे पुढील नियोजन करण्यात आले.
डोंगरमेंढा गावाला अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ नुसार २०१० मध्ये सामूहिक वनहक्काच्या माध्यमातून ९१२.०५ हे.आर.क्षेत्र प्राप्त झाले आहे.त्यानुसार ग्रामसभा डोंगरमेंढा यांनी २०२१ पासून सामुहिक क्षेत्रातील तेंदूपत्ता संकलन आणि विक्री करीता वन हक्क कायद्यानुसार ग्रामसभा बैठक घेऊन संकलन करीत आहेत.तसेच ३० नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभा रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित झाल्यानुसार सामुहिक वन हक्क क्षेत्रामधील कक्ष क्र.९०२ मध्ये १ कि.मी.क्षेत्र जागेवर चर उंचवठा व टीसीएम (TCM) तयार करणे कामाला सुरवात करण्यात आली आहे.ग्रामसभेला प्राप्त सामूहिक वनहक्क क्षेत्राचे संरक्षण,संवर्धन,संगोपन आणि व्यवस्थापन करण्याचे अधिकार व सामुहिक क्षेत्र २०१० पासून गावाला मिळाले,परंतु विकास करायचे म्हटले तर आर्थिक पाठबळ महत्वाचे असल्याने त्यासाठी विविध अभ्यास बैठकीच्या माध्यमातून रोजगार हमी कायद्याची जोड मिळाली. त्यानुसार विविध कामे व रोजगार गावातच मिळत असल्याने ग्रामवासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील सामुहिक जंगलाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळत असल्याने सृष्टी संस्था (येरंडी, ता.कुरखेडा)संस्था संयोजक केशव गुरनुले यांच्या वर्षानूवर्षाच्या प्रयत्नाला ग्रामवासियांनी शुभेच्या दिल्या.सामुहिक वन हक्क क्षेत्रातील विकास कामे करण्यासाठी राकेश खेवले यांच्या मदतीने वन व्यवस्थापन आराखडा तयार केला असून त्यास प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सृष्टी संस्था येरंडी,ता.कुरखेडा, जिल्हा प्रशासन,तालुका पातळीवरील कार्यरत प्रशासकीय यंत्रणाच्या तांत्रिक मदतीच्या माध्यमातून गावातील सामूहिक वनहक्क क्षेत्राचे विकास,वाढ करण्यासाठी आणि गावातील लोकांना रोजगार, वनउपज संपत्तीचे जतन,करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.आयोजित कार्यक्रम प्रसंगी सृष्टी संस्था संयोजक केशव गुरनुले,ग्रामसभा अध्यक्ष श्रीराम जेठू राऊत,शिवराम मळू नेवारे सचिव,राजकुमार धारगावे,हिरामण कुळमेथे पांडुरंग मस्के,गजानन बगमारे,होमराज डोंगरवार,गोपाळा राऊत ग्रामसभा सदस्य,वन विभागाचे वनरक्षक कृष्णाजी दहीकर तथा उपस्थित मजूर गण सृष्टी संस्थेचे कार्यकर्ता देवराव ठेंगरी,राकेश खेवले ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली होती.
- Advertisement -

