Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तडॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर; महागाई वाढण्याची चिन्हे..!

डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर; महागाई वाढण्याची चिन्हे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आखाती देशातील उद्धजन्य परिस्थिती आणि मध्यपूर्वेतील वाढता तणाव व कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आज,बुधवार ४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरून ९२.१३ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.यापूर्वी जानेवारीमध्ये रुपया ९१.९८ च्या नीचांकी पातळीवर गेला होता.तज्ज्ञांच्या मते,जोपर्यंत युद्ध शांत होत नाही, तोपर्यंत रुपयावर दबाव कायम राहू शकतो.यावर्षी आतापर्यंत रुपयात २ टक्के पेक्षा जास्त घसरण झाली आहे,ज्यामुळे २०२६ मध्ये जगातील उदयोन्मुख बाजारांमधील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी ते एक बनले आहे.मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती $८५ प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचल्या आहेत.भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के पेक्षा जास्त तेल आयात करतो,ज्यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे.विशेष म्हणजे,प्रत्येक देशाकडे परकीय चलन साठा असतो.परकीय चलनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवहार केल्या जाते.परकीय साठा कमी होण्याचा आणि वाढण्याचा परिणाम चलनावर दिसतो.याचे साधे उदाहरण पाहायचे झाले तर भारताच्या परकीय चलन साठ्यात डॉलर,अमेरिकेच्या रुपयांच्या साठ्याइतका असेल तर रुपयाची किंमत स्थिर राहील.आपल्याकडील डॉलर कमी झाल्यास रुपया कमकुवत होईल,तर वाढल्यास रुपया मजबूत होईल.युद्धाच्या वातावरणात, परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या मालमत्तेतून पैसे काढून डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत.डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपया कमकुवत झाला आहे.तेल महाग झाल्यामुळे भारतात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे,ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारापासून दूर राहत आहेत.
गेल्या महिन्यात अमेरिका आणि भारतामध्ये झालेल्या व्यापार करारानंतर रुपयाची स्थिती सुधारेल असे वाटले होते.त्यावेळी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली होती आणि रुपयाने थोडी रिकव्हरीही केली,पण मध्य-पूर्वेत जसजशी लढाई वाढली,तसतशी ती मदत काही दिवसांतच संपली. यामुळे,परदेशात शिक्षण आणि फिरणे महाग झाले आहे.मोबाइल,लॅपटॉप आणि परदेशातून येणारे इतर भाग महाग होऊ शकतात, कारण कंपन्या त्यांचे पेमेंट डॉलरमध्ये करतात.जर कच्च्या तेलाचे दर असेच वाढत राहिले,तर येत्या काळात देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही वाढू शकतात.काही तज्ज्ञांच्या मते,रुपयाची वाटचाल पूर्णपणे इस्त्रायल-इराण युद्धाची परिस्थिती आणि जागतिक तेल बाजारावर अवलंबून असेल. जोपर्यंत तणाव कमी होत नाही,तोपर्यंत रुपयात चढ-उतार सुरूच राहील.तथापि,भारतीय रिझर्व्ह बँक रुपयाला आणखी घसरण्यापासून वाचवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करू शकते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!