- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-शाळेत जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या स्कूटीला वाटेतच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.यात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यावस्थेत आहे.तर एका विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर मार लागला.यश प्रकाश मेश्राम वय १४ वर्षे,रा.अऱ्हेरनवरगाव,ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर असे गंभीर जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे,तर त्याचा सहकारी मित्र रोनक राजू नागापुरे वय १४ वर्षे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.दोघेही ब्रम्हपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी शाळेतील विद्यार्थी आहेत.
यश व रोनक हे आज सकाळच्या सुमारास अऱ्हेरनवरगाव येथून एमएच ३४ सीपी ६१३९ क्रमांकाच्या एक्टिवा मोपेड स्कूटीने नेवजाबाई हितकारिणी शाळेत ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमासाठी निघाले होते.अश्यातच बोंडेगाव ते कुर्झा रोडवरील राधाकृष्णनगरी जवळ येताच भरधाव वेगात येणाऱ्या एमएच ३४ सीडी ७६६८ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी जोरात खाली कोसळले.यात एकाच्या डोक्याला तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.प्रकरणी सोनू भुते यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रॅक्टरचालक दुर्योधन तलमले याचे विरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५(ए),१२५(बी)सह १८४, १३४ एमव्ही ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तेजराम जनबंधू करीत आहेत.
- Advertisement -

