Sunday, August 30, 2026
Homeनागपूरजेवणानंतर काही वेळातच १५ विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ व अशक्तपणा..

जेवणानंतर काही वेळातच १५ विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ व अशक्तपणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जेवण केल्यानंतर काही वेळातच ३१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १५ विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ व अशक्तपणा जाणवू लागल्याने आश्रम शाळेत एकच खळबळ उडाली.सदरची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील काचुरवाही येथील सूरज मतिमंद (गतिमंद)मुला-मुलींच्या निवासी शाळेत घडली.शाळा प्रशासनाने घटनेची माहिती रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय वाघमारे यांना दूरध्वनीद्वारे दिली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉ.वाघमारे यांनी त्वरित वैद्यकीय पथक शाळेकडे रवाना केले.शाळेत पोहोचलेल्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी पत्तागोबीची भाजी,डाळ व भात असा स्वयंपाक शाळेतील कुकने तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.मात्र,जेवणानंतर काही वेळातच १५ विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ व अशक्तपणा जाणवू लागल्याने शिक्षकांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधला.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांकडून प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी काचुरवाही येथील शाळेत जाऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!