Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीआमदार मसरामांनी आरोग्य सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.. - आरमोरी-कुरखेड्यासाठी ब्लड...

आमदार मसरामांनी आरोग्य सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.. – आरमोरी-कुरखेड्यासाठी ब्लड बँकची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरोग्य सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी आरमोरी,कुरखेडा येथे तातडीने स्वतंत्र ब्लड बँक स्थापन करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे दोन दिवसाच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असतांना आरोग्य विभागाच्या आढावा बैठक प्रसंगी मसराम बोलत होते.जिल्ह्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत रक्त उपलब्ध होण्यात मोठ्या अडचणी येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.अपघात,प्रसूती व गंभीर आजारांच्या वेळी रुग्णांना चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे हलवावे लागते,त्यामुळे उपचारास विलंब होऊन जीवितहानीचा धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार मसराम यांनी विविध तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर,परिचारिका व तंत्रज्ञांची अनेक पदे रिक्त असल्याचा मुद्दाही उपस्थित केला.रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडल्याची स्थिती निर्माण झाली असून, तातडीने भरती प्रक्रिया राबवावी,अशीही मागणी त्यांनी केली.
तसेच आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याची गंभीर समस्या त्यांनी मांडली.काही ठिकाणी रुग्णवाहिका नसणे, चालकांची कमतरता आणि तांत्रिक बिघाड यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.आरमोरी किंवा कुरखेडा येथे सुसज्ज ब्लड बँक स्थापन केल्यास परिसरातील हजारो नागरिकांना तातडीची व प्रभावी आरोग्य सेवा मिळू शकेल,असा विश्वास आमदार मसराम यांनी व्यक्त केला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!