Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियामागितले दोन हजार अन् घेतले दीड हजार; सहाय्यक महसुल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

मागितले दोन हजार अन् घेतले दीड हजार; सहाय्यक महसुल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका अवैध बांधकाम केलेल्या प्रकरणातील निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी दोन हजाराची लाच मागून दीड हजार स्वीकारल्याप्रकरणी देवरी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसुल अधिकारी(लिपिक)गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.संदेश नैनदास बोरकर वय ३९ वर्षे,पद सहाय्यक महसुल अधिकारी-प्रस्तुतकार १ तहसिल कार्यालय देवरी ता.देवरी जि.गोंदिया,सध्या रा.कैलाश नागरीकर,यांचे घरी किरायाने पंचशिल चौक विठठल रुखमाई मंदिरच्या मागे,देवरी,मुळ पत्ता-रा.ठाणा,ता.आमगांव जि.गोंदिया असे लाचखोर लीपिकाचे नाव आहे.
यातील तक्रारदार राहत असलेल्या देवरी येथील सर्वे नंबर ३०९/१/ब मधील सोसायटीमध्ये खुली जागा(ओपन स्पेस)असून,सदर खुल्या जागेवर सार्वजनिक गणेश व साई बहुउददेशिय संस्था देवरी यांनी अवैध बांधकाम केले आहे.सदर बांधकाम  काढण्यासाठी तक्रारदार व ईतर नागरिकांनी नगरपंचायत देवरी व मंडळ अधिकारी यांना पत्रव्यवहार करुन सुध्दा कायदेशिर कारवाई न झाल्यामुळे तक्रारदार व ईतर नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती.सदर याचिकेत न्यायालयाने योग्य कार्यवाही करण्याबाबत देवरी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले होते.सदर आदेशाचे अनुषंगाने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी देवरी यांना पत्र लिहुन न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करणेबाबत पत्र दिले असता,उपविभागीय अधिकारी देवरी यांनी तहसिलदार देवरी यांना सदर प्रकरणात सविस्तर चौकशी तथा तपासणी करुन आवेदकास परस्पर कळविण्याबाबत व वस्तुनिष्ठ अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत १८ डिसेंबर २०२५ रोजी कळविले होते.त्यानुसार,गुरुवार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार हे तहसिल कार्यालय देवरी येथे सदर अर्जाबाबत चौकशी करण्यासाठी गेले असता लिपीक संदेश बोरकर यांना भेटले.दरम्यान,
बोरकर याने तुमच्या बाजुने अहवाल तयार करुन देण्यासाठी २ हजार रुपये लागतील व दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारीला परत फोन लावून
सायंकाळी २ हजार रुपये घेऊन या असे सांगितले.मात्र, तक्रारदारास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने काल शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे जाऊन तक्रार दिली.
सदर तक्रारीवरुन काल शुक्रवारी सापळा अधिकारी यांनी दोन पंचासह देवरी येथे जाऊन पडताळणी केली. पडताळणीत तक्रारदार यांच्या बाजुने अहवाल तयार करुन पाठविण्यासाठी तडजोडअंती १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली असता संदेश बोरकर यास रंगेहाथ पकडण्यात आले.प्रकरणी आरोपी संदेश बोरकर विरुध्द देवरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम १९८८(संशोधन अधिनियम- २०१८)कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून,आरोपीस आज,शनिवार १४ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास अटक करण्यात आल्याची माहिती एसीबीने दिली.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपुर,माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपुर,विजय माहुलकर अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले,पोलीस निरीक्षक अरविंद राऊत,स.फौ.चंद्रकांत करपे,पो.हवा.संजय बोहरे,पो.हवा मंगेश कहालकर,ना.पो.शि.संतोष शेंडे, अशोक कापसे,संतोष बोपचे,प्रशांत सोनवाने,महिला नापोशि.संगिता पटले,रोहीणी डांगे,चालक पोहवा. सोमेश इंदुरकर यांचे सह लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी केली.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांची लोकसेवकाविरुध्द तक्रार असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे खालील माध्यमाद्वारे संपर्क करावा.त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात येईल,असे पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांनी म्हटले आहे.
टोल फ्री क्रमांक : 1064
व्हॉट्सॲप नं. :- 9664959090
Email Id: acbgondia@gmail.com
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!