Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोली“जय भवानी,जय शिवाजी” च्या घोषणांनी दुमदुमली गडचिरोली नगरी.. -छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती...

“जय भवानी,जय शिवाजी” च्या घोषणांनी दुमदुमली गडचिरोली नगरी.. -छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, सुशासन व सर्वसमावेशक विचारांमधून प्रेरणा घेत युवा पिढीने राष्ट्रहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज,गुरुवार १९ फेब्रुवारीला जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा भवन येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व भव्य पदयात्रा प्रसंगी ते बोलत होते.निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे,जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे,शिक्षणाधिकारी (माध्यमिक)वासुदेव भुसे,शिक्षणाधिकारी(प्राथमिक) बाबासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते समशेर खान पठाण यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गाडे पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी सर्व समाजघटकांना सोबत घेत स्वराज्य उभारले.आजच्या काळातही सर्वांना समान संधी देत, एकात्मतेच्या भावनेतून “नवीन गडचिरोली” घडविण्याची गरज आहे.शासन देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्नशील असून,या वाटचालीत प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे,असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथून भव्य पदयात्रेला सुरुवात झाली.शहरातील एल.आय.सी.चौक,आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय याप्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही पदयात्रा शासकीय विश्रामगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समारोपास आली.यावेळी पदयात्रेदरम्यान “जय भवानी,जय शिवाजी” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.देशभक्ती,शौर्य व स्वाभिमानाचा संदेश देणाऱ्या या घोषणांमुळे वातावरणात उत्साहाची लहर निर्माण झाली होती.
पदयात्रेपूर्वी एन.एस.एस.,स्काऊट अँड गाईड तसेच विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर व ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या पदयात्रेत लोकप्रतिनिधी,प्रशासकीय अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!