Sunday, September 13, 2026
Homeगडचिरोली'जत्रा घडली नागोबाची'; भक्तीरसातून आदर्श जीवनमुल्यांचा शोध घेणारी उत्तम नाट्यकृती.. -ज्येष्ठ रंगकर्मी,साहित्यिक...

‘जत्रा घडली नागोबाची’; भक्तीरसातून आदर्श जीवनमुल्यांचा शोध घेणारी उत्तम नाट्यकृती.. -ज्येष्ठ रंगकर्मी,साहित्यिक डॉ.बळवंत भोयर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे लिखीत ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्याच्या पुस्तकाचे विमोचन आज,सोमवार १९ मे रोजी गडचिरोली येथील मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात ज्येष्ठ रंगकर्मी साहित्यिक,कवी व समिक्षक डॉ.बळवंत भोयर यांच्या हस्ते थाटात पार पडले.
या महानाट्यातील कथा धार्मिक असली तरी त्यातील विचार आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करते, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.श्याम मोहरकर ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक हे होते,तर प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम यांनी पुस्तकावर भाष्य केले.विशेष अतिथी म्हणून साहित्यिक व रंगकर्मी नागपूर येथील पोलिस उप अधिक्षक पांडुरंग सोनवणे उपस्थित होते. ‘झाडीपट्टीतील २८ कलावंत व १२ तंत्रज्ञांना एकत्र आणण्याचे व त्यांच्या कलेला उजागर करुन “जत्रा घडली नागोबाची” सारखे महानाट्य रंगमंचावर साकारण्याचे व आज तेच नाटक पुस्तकरुपाने प्रकाशित करण्याचे धाडस चुडाराम  बल्हारपुरे यांनी जत्रा घडली नागोबाची नाटकाच्या रूपाने केले असून  वाचन संस्कृती लोप पावत असलेल्या आजच्या परिस्थितीत ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.’ असे प्रतिपादन डॉ .श्याम मोहरकर यांनी केले.सोबतच त्यांनी “जत्रा घडली नागोबाची” या नाटकातील विविध प्रसंगांवर समिक्षणात्मक विवेचन केले.प्रसंगाचे औचित्य साधून २५ वर्षांपूर्वी सादर झालेल्या या महानाट्याच्या प्रथम प्रयोगातील ज्येष्ठ कलावंत जयदेव सोमनाथे,प्रकाश गाठे,वासुकुमार मेश्राम, सुनील चडगुलवार,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, टिकाराम सालोटकर,प्रभाकर गडपायले,प्रा.यादव गहाणे,राजेंद्र जरुरकर,सिध्दार्थ गोवर्धन,रवीकुमार कालेश्वरवार यांचेसह योगेश गोहणे,प्रा.अरुण बुरे, रमेश निखारे,मारोती लाकडे,निरंजन भरडकर,विठ्ठल खानोरकर,दिवाकर बारसागडे,हेमंत कावळे,जितेंद्र उपाध्याय इत्यादी कलावंतांचा सत्कार करण्यात आला.भाष्यकार प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम यांनी नाटकावर समिक्षणात्मक भाष्य करतांना त्यातील अनेक प्रसंग व घटनावर  प्रकाश टाकला.नाट्यश्रीचे संगीतकार विठ्ठल खानोरकर,प्रसिद्ध नाट्यकलावंत दिवाकर बारसागडे व तालरक्षक केवळ बगमारे यांनी महामृत्युंजय मार्कंडेश्वर नाटकातील नांदी द्वारे नटेश्वराची आराधना केली व स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.तसेच नाट्यश्रीचे प्रसिद्ध गायक प्रकाश गाठे यांनी आपल्या खड्या आवाजात  “जत्रा घडली नागोबाची” नाटकातील पोवाडा सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.प्रकाशन सोहळ्याचे सुत्र संचलन प्रा.यादव गहाणे,प्रास्ताविक दिलीप मेश्राम यांनी केले.लेखकीय मनोगत नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी व आभार दादाजी चुधरी यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,रमेश निखारे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, जितेंद्र उपाध्याय,मारोती लाकडे,निरंजन भरडकर, राजेंद्र जरुरकर,वसंत चापले,हेमंत कावळे,जितेंद्र उपाध्याय व चुडाराम बल्हारपुरे यांनी सहकार्य केले. या सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात कविसंमेलन घेण्यात आले.त्यात ७८ कवींनी आपल्या कविता सादर केल्या.सर्व सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नाटयश्रीच्या वतीने सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या आठवडी कविता स्पर्धेच्या ५० सत्रातील ६० विजेत्या कवींना “नाट्यश्री उत्कृष्ट कवी पुरस्काराने पुस्तक व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.प्रमुख अतिथी प्राचार्य श्याम मोहरकर,बळवंत भोयर,पांडुरंग सोनवणे व जनबंधू मेश्राम यांना सन्मानवस्त्र,सन्मानपत्र,पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!