Monday, September 7, 2026
Homeगोंदियाचिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या किशोर शेंडे ला १० वर्षाचा सश्रम कारावास…

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या किशोर शेंडे ला १० वर्षाचा सश्रम कारावास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी नराधमाला १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.किशोर रामू शेंडे (वय ३० रा.मोखे (किन्ही, ता.साकोली,जि.भंडारा) असे आरोपीचे  नाव आहे.

मानवतेला लाजवेल अशी घटना २३ एप्रिल २०१९ रोजी गोंदिया जिल्ह्यात घडली.माहितीनुसार, आरोपीने ५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाच्या मंडपातून जवळील शेतात घेऊन जात तिच्यावर अत्याचार करून पसार झाला.याप्रकरणी फिर्यादीच्या

तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात कलम ३६३, ३६६ (ए),३७६ (ए-बी),५११, ३५४, ३५४ (ए) भादंवि, सहकलम ८,१२ पोक्सो कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीला अटक करून सखोल तपास केला.सर्व साक्ष,पुरावे,परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने हे प्रकरण विशेष प्रकरण म्हणून न्यायालयीन कार्यवाही सुरू केली.सरकारतर्फे सरकारी वकील पारधी यांनी न्यायालयात युक्तिवाद

केला.आरोपींविरुद्ध सर्व साक्ष,पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वानखेडे यांनी आरोपी किशोर शेंडे याला दोषी ठरवत भादंवि कलम ३६३ अन्वये ३ वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड,दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.तसेच कलम३५४ अन्वये ३ वर्षे कारावास,१ हजार रुपये दंड,दंड न भरल्यास१ महिना अतिरिक्त कारावास व कलम ३७६ (ए बी)भादंवि अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या

मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लोणकर तिरोडा यांनी केले.न्यायालयीन कामकाज पोलीस हवालदार मोहन भोयर,पोलीस स्टेशन तिरोडा यांनी पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!