Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचित्रपट निर्मात्याची गळफास घेऊन आत्महत्या..

चित्रपट निर्मात्याची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एका ४३ वर्षीय दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने उत्तर गोव्यातील सिओलीम गावातील भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,सोमवार ३ फेब्रुवारीला उघडकीस आली.केपी चौधरी उर्फ सुनकारा,शंकर कृष्ण प्रसाद चौधरी वय ४३ वर्षे असे आत्महत्या केलेल्या चित्रपट निर्मात्याचे नाव आहे.
के.पी.चौधरी याने रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे.यात गब्बर सिंग,अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने केपी यांना २०२३ मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.चौधरी यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याची चर्चा सुरू आहे.कोरोना कालावधीत आर्थिक चणचण जाणवत असल्याने ड्रग्ज व्यवसायात गुंतून ड्रग्जच्या आहारी गेल्याने सर्वकाही गमावून बसले होते.त्यातच काही कालावधीपासून गोव्यात वास्तव्यास आलेल्या केपी चौधरी याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले अद्यापही स्पष्ट नसल्याने अंजुना पोलीस ठाण्याच्या सिओलीम चौकीला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!